अंतर भेटीचे

साई मणकर
Tuesday, 21 May 2019

नाते अतूट जुळले मनाचे मनाशी...
गरज काय त्याला स्पर्शाच्या आभासाची..?

असुदे ना थोडे कालांतरच भेटीत या...
थोडी वाढु दे आस थोडा ध्यास भेटीत या...

दुराव्यात ही असतो अमुल्य गोडवा प्रेमाचा...
अंतराने वाढतो ध्यास मनांचा...

नजरेआडच्या प्रेमाला मोल मनाच्या कोंदणात...
श्वासात जपलेले असते प्रेम अंतरात...

नाते अतूट जुळले मनाचे मनाशी...
गरज काय त्याला स्पर्शाच्या आभासाची..?

असुदे थोडे अंतरच भेटीचे...
आसुसलेल्या मनाला ओढ शिगेची...

भेटीत मग त्या मजाच और आहे...
कालांतराने मिटणाऱ्या अंतराची नशाच और आहे..!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News