डिस्टन्स एज्युकेशनची ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया जाहीर; 'या' अभ्यासक्रमाला मिळणार प्रवेश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 8 September 2020
  • नोकरी, व्यवसायामुळे अनेक विद्यार्थ्यांना रेग्यूलर शिक्षण घेता येत नाही, असे विद्यार्थी डिस्टन्स एज्युकेशन घेऊन उच्च शिक्षण पुर्ण करतात.

मुंबई : विद्यापीठाच्या डिस्टन्स अँड ओपन लर्निंग एज्युकेशनची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया मंगळवार पासून सुरू झाली. त्याकरिता विद्यार्थ्यांकडून अर्ज मागण्यात येत आहेत. ही प्रक्रिया 23 सप्टेंबर पर्यंत सुरू राहील अशी माहिती मुंबई विद्यापीठाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली. नोकरी, व्यवसायामुळे अनेक विद्यार्थ्यांना रेग्यूलर शिक्षण घेता येत नाही, असे विद्यार्थी डिस्टन्स एज्युकेशन घेऊन उच्च शिक्षण पुर्ण करतात. त्यामुळे एकीकडे व्यवसाय, नोकरी सुरु असते तर दुसरीकडे शिक्षण पुर्ण होते. 

कोणत्या अभ्यासक्रमाला मिळणार प्रवेश 
 
एम. ए सेकन्ड पार्ट:  

  • इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि शिक्षणशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेता येणार आहे. 
  • एम कॉम, एम. एसस्सी: गणित, आयटी अँड कम्प्युटर सायन्स  
  • एमएससीए सेकंड अॅड थर्ड इयर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळेल.

पदवी : 

  • बी. ए, बी.कॉम, बी. एसस्सी, आयटी अँड बी. एसस्सी कम्प्युटर सायन्स द्वितीय आणि तृतीय वर्षासाठी प्रवेश मिळणार आहे 

पात्रता

  • विद्यार्थ्यांने बी. ए प्रथम वर्ष, बी. कॉम प्रथम वर्ष,  बीएससी आयटी प्रथम वर्ष पास असावे
  • पार्ट वन: एम. ए, एम. कॉम, एम. एसस्सी आयटी अँड कम्प्युटर सायन्स उत्तीर्ण 
  • एमसीए प्रथम वर्षे पात्रता धारक विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत 

विद्यापीठाचे इन्स्टिट्यूट ऑफ डिस्टन्स अँड ओपन लर्निंग सेंटर 

  • चर्चगेट: विद्यापीठ विद्यार्थी भवन बी. रोड चर्चगेट मुंबई 
  • ठाणे कॅम्पस : बाळकुंम, रणवल गार्डन, ठाणे- भिवंडी रोड, बाळकुम नाका, ठाणे वेस्ट 4000608
  •  कल्याण कॅम्पस: नियर हिना गार्डन, वसंत व्हॅली रोड, गांधारी व्हिलेज, खडकपाडा कल्याण पश्चिम 
  • रत्नागिरी कॅम्पस : प्लॉट नंबर पी-61 एमआयडीसी मीरजोली रत्नागिरी 
  • अधिक माहितीसाठी- www.old.mu.ac.in  
    ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे संपर्क- wwww.idoloa.digitaluniversity.ac 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News