हा वाद पोहचला आता थेट दिल्लीत 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019
  • पंजाबमधील वाद राहुल यांच्या दरबारी
  • पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि मंत्री सिद्धू यांच्यात वाद 

नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील संघर्ष आता काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या राहुल गांधींच्या दरबारात पोचला आहे. सिद्धू यांनी सोमवारी राहुल आणि प्रियांका गांधींना भेटून मुख्यमंत्र्यांबाबतचे गाऱ्हाणे मांडले. या भेटीत सिद्धू यांनी ‘राज्यातील परिस्थिती’चे कथन करणारे पत्र पक्षश्रेष्ठींना दिले असले, तरी प्रत्यक्षात त्यांनी स्वतःसाठी नव्या जबाबदारीची मागणी केल्याचे कळते. 

पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि मंत्री सिद्धू यांच्यात विस्तव जात नाही अशी परिस्थिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सिद्धू यांनी पंजाबमध्ये ग्रामीण भागात काँग्रेसच्या पराभवाचे खापर मुख्यमंत्र्यांवर फोडले होते, तर अमरिंदरसिंग यांनी सिद्धू यांच्यावर शहरी भागातील पराभवाचा आरोप करताना त्यांचे खाते बदलून पंख छाटले. 

प्रशासकीय सोयीसाठी तयार केलेल्या आठ सल्लागार समूहांपासून सिद्धू यांना दूर ठेवताना त्यांचे स्थानिक प्रशासन तसेच पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालय काढून ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा खात्याची जबाबदारी दिली.
यामुळे संतप्त झालेल्या सिद्धू यांनी राहुल गांधींकडे धाव घेऊन मुख्यमंत्र्यांची तक्रार केली. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News