जाणून घ्या, स्वतःला गोड खान्यापासून कसं आवरतात हे ऍक्टर लोक

यिनबझ टीम
Wednesday, 22 January 2020

दिशा पाटनी म्हणते, मला साखर खूप आवडते. मला चॉकलेट देखील आवडते. मी खाण्याच्या बाबतीत स्वत:ला खूपदा फसवतेदेखील, परंतु जेव्हा मी पूर्णपणे तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करते, तेव्हा मी नेहमीच एका स्नॅकच्या शोधात असते, जे माझी साखर खाणे किंवा गोडपणाची आवड असणे कमी करतील.

दिशा पाटनी तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या फिटनेसला घेऊन जास्त चर्चेत असते. ती तिच्या फिटनेस संबंधित पोस्ट्स आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत राहाते. तथापि, कोणत्याही सामान्य व्यक्तीप्रमाणेच त्यांनाही तंदुरुस्तीशी संबंधित विशेषत: गोड आणि जंक फूड खाण्याच्या संबंधित असलेल्या फिटनेस टिप्सला पाळावं लागतं.

disha patani

दिशाला सुपर टोन बॉडी मिळवण्यासाठी स्ट्रिक्ट डायट प्लॅन करावा लागतो. विशेष म्हणजे, दिशाला गोड पदार्थही आवडतात. त्यामुळे ती आपल्या आहारावर कशाप्रकारे लक्ष केंद्रित करते, याबद्दल नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले आहे.

disha patani

फिटनेसची क्रेज असलेल्या दिशा पटानीने सांगितले की तिला साखर खुप आवडते. यावर तिने सांगितले की एक स्नॅक घेतल्यानंतर माझी साखर खाण्याची तल्लब निघून जाते. दिशा म्हणते की, 'एक अभिनेत्री म्हणून मला फिट राहाणे गरजेचे आहे, फक्त मी माझ्या चित्रपटांसाठी आणि प्रोजेक्ट्ससाठी म्हणून याकडे लक्ष देत नाही, तर एक सामान्य आयुष्य जगतानादेखील फिटनेस माझ्यासाठी गरजेचा असल्याची ती सांगते. मी माझ्या व्यायामाच्या रूटीनमध्ये कधीच अडथळा आणत नाही आणि प्रत्येकवेळी मी त्यातून खूप आनंद घेत असते.

disha patani

मी नेहमीच त्या पर्यायांचा किंवा वस्तूंच्या शोधात असते, जे जेवल्यानंतर माझ्यासाठी डेजर्टचे काम करतील आणि माझ्या तब्येतीवरदेखील परिणाम करणार नाहीत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News