दिशा-आदित्य यांची चित्रपट ‘मलंग’साठीची मेहनत 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 31 December 2019

दिशा पटानी आणि आदित्य रॉय कपूर त्यांच्या आगामी ‘मलंग’ चित्रपटाकडे लक्ष केंद्रित करत आहेत. दिशा-आदित्यचा हा पहिलाच एकत्रित चित्रपट आहे. त्यामुळे आपली केमिस्ट्री अधिक खुलून दिसावी म्हणून दिशा-आदित्यने एक आगळावेगळा रोमॅण्टीक सीन या चित्रपटासाठी शूट केला आहे.

या दोघांनी अंडरवॉटर काम केले आहे आणि याचे चित्रीकरण गोव्यामध्ये नुकतेच झाले. चित्रपटाच्या कथेची गरज म्हणून दिशा-आदित्यने अंडरवॉटर काही मिनिटांचे चित्रीकरण केले आणि त्यासाठी या दोघांना खूप मेहनतही घ्यावी लागली.

दिशा-आदित्यला यासाठी खास प्रशिक्षणही देण्यात आले होते. ‘मलंग’साठी सध्या हे दोघं घेत असलेली मेहनत चित्रपटाला फायदेशीर ठरणार का, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कळेलच.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News