बारावीच्या परीक्षाकडे झाले संचालकांचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 February 2020

दररोज होणाऱ्या पेपरची ऑनलाइन माहिती भरण्याची जबाबदारी त्या-त्या केंद्र संचालकांवर देण्यात आली आहे. पहिल्या सत्रात होणाऱ्या पेपरची माहिती एक ते तीन, दुसऱ्या सत्रातील पेपरची माहिती सायंकाळी पाच ते सात या वेळेत भरण्याची सूचना मंडळाने केली होती. प्रत्येक पेपरला किती मुले हजर, किती गैरहजर,किती कॉपी केसेस, भरारी पथकाने किती केंद्रांना भेटी दिल्या, बैठ्या पथकाने काय केले आदी माहिती भरणे अभिप्रेत आहे.

जालना : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षेसाठी उपलब्ध तंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदाच्या परीक्षेपासून विद्यार्थी उपस्थिती, दररोज होणारी कॉपीची प्रकरणे, भरारी पथकांचे कार्य आदी माहिती रोजच्या रोज ऑनलाइन भरण्याची सूचना असली, तरी राज्यातील ३१७ परीक्षा केंद्र संचालकांनी पेपर झाल्यानंतर ऑनलाइन नोंदणी केली नसल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

मंडळाने सर्व विभागीय मंडळातील बारावी परीक्षा केंद्र संचालकांना दोन दिवसांपूर्वी सूचना देऊन पेपर संपताच संबंधित माहिती ऑनलाइन नोंदणी करण्याचे आदेश दिले होते. मंडळाने राज्यात बारावीची सुमारे ३ हजार ४६ परीक्षा केंद्रे दिली आहेत. परीक्षेदरम्यान उपस्थिती, अनुपस्थिती, गैरमार्ग प्रकरणे, भरारी व बैठ्या पथकाने दिलेल्या भेटी यासह इतर बाबींची माहिती केंद्र संचालकांनी पेपर झाल्यानंतर लगेच, ठरवून दिलेल्या वेळेत भरावी असे अभिप्रेत आहे. 

बारावीचा पहिला पेपर झाल्यानंतर पुणे विभागात ३८६, नागपूर ४७५, औरंगाबाद ४०६, मुंबई ६१५, कोल्हापूर १६२, अमरावती ४९८, नाशिक २३५, लातूर २०९, तर कोकण विभागातील ६० केंद्र संचालक सूचनेनुसार नोंदणी केली आहे. राज्यातील विविध विभागांतील सुमारे ३१७ केंद्र संचालकांनी अद्यापही ऑनलाइन नोंदणीच केली नसल्याची विश्वसनीय माहिती आहे.

यात पुणे विभागात १८, नागपूर विभाग १५, औरंगाबाद विभाग ९५, मुंबई विभाग १२७, अमरावती विभाग २५, तर लातूर विभागातील ३६ परीक्षा केंद्र संचालकांचा तसमावेश अहे. कोल्हापूर व कोकण विभागातील केंद्र संचालकांनी शंभर टक्के माहिती भरली आहे. सर्वांत कमी म्हणजे ७६ टक्के माहिती औरंगाबाद विभागात भरण्यात आली आहे.

औरंगाबाद विभागीय मंडळात ९५ परीक्षा केंद्र संचालकांनी माहिती भरली नसल्याची आकडेवारी सांगते. सूचनेनुसार माहिती न भरणाऱ्यांबाबत मंडळ काय भूमिका घेते, याकडे लक्ष असेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News