दिशाने व्यक्त केली 'या' चित्रपटाक काम करण्याची इच्छा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 23 April 2020
  • अभिनेत्री दिशा पटानीने तेलुगू चित्रपटापासून तिच्या करिअरची सुरुवात केली.

अभिनेत्री दिशा पटानीने तेलुगू चित्रपटापासून तिच्या करिअरची सुरुवात केली. एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी चित्रपटामधून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं अन्‌ तिला हिंदी चित्रपटांची लॉटरीच लागली.

बॉलीवूडमधील बिग स्टार्सबरोबर काम करण्याची संधी दिशाला मिळाली. दिशानेही प्रत्येक वेळी तिला मिळालेल्या सुवर्णसंधीचं सोनं केलं. भारत, बागी 2, मलंगसारख्या हिंदी चित्रपटांतील तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरल्या. सतत काही ना काही नवं करू इच्छिणाऱ्या दिशाला आता ऍक्‍शनपटाचे वेड लागले आहे.

बागी 2 या ऍक्‍शपटात तिने केलेलं काम कौतुकास्पद होतंच, पण महिलाप्रधान ऍक्‍शनपट करण्याची तिची इच्छा आहे. दिशा म्हणते, "मला माझ्या भूमिकांबाबत नवनवीन प्रयोग करण्यास आवडतात. यापुढे मला एका धमाकेदार ऍक्‍शनपट चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे.' सध्या तरी दिशाकडे सलमान खान स्टार राधे चित्रपट आहे. या चित्रपटाच्या तयारीत ती सध्या व्यस्त आहे.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News