दिग्दर्शन विवेक देशपांडे नव्या भूमिकेत 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 27 December 2019

तब्बल १४ वर्षांनंतर ते पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात एका मालिकेतून कमबॅक करत आहेत. फक्त मराठी वाहिनीवरील ‘देव पावला’ असे या मालिकेचे नाव आहे.

‘आभाळमाया’, ‘ऋणानुबंध’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या सुपरहिट मालिकांचे दिग्दर्शन विवेक देशपांडे यांनी केले. ‘बंधन’ मालिकेत त्यांनी भूमिका साकारल्यानंतर तब्बल १४ वर्षांनंतर ते पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात एका मालिकेतून कमबॅक करत आहेत.

फक्त मराठी वाहिनीवरील ‘देव पावला’ असे या मालिकेचे नाव आहे. या मालिकेत ते इन्स्पेक्‍टरची भूमिका साकारणार आहेत. दिग्दर्शन आणि अभिनय क्षेत्रात हातखंडा असलेल्या एका अभिनेत्याला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यास प्रेक्षकांना रंजक ठरेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News