मुंबई : कोरोनामुळे देशावर आर्थिक संकट कोसळले आहे. लॉकडाऊन काळात अनेक कंपन्या बंद झाल्या. लाखो कर्माचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे देशात दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत अभियात्रिकी विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी चालून आली आहे. भारत इलेक्ट्रानिक लिमीटेड (BEL) कंपनीत ४० जागांसाठी तात्पुर्त्या स्वरुपात भरती निघाली. थेट मुलाखतीद्वारे विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळणार आहे.
पदाचे नाव आणि तपशील :
अनु. क्र पदांचे नाव पदे
१. ट्रेनी इंजिनियर इलेक्ट्रानिक १ १६
२ ट्रेनी इंजिनियर मेकॉनिकल १ ०४
३. प्रोजेक्ट इंजिनियर इलेक्ट्रानिक १ १६
४. प्रोजेक्ट इंजिनियर मेकॉनिकल १ ०४
शैक्षणिक पात्रता :
अनु. क्र.१ :
इलेक्ट्रनिक/ बी. टेकमध्ये फस्ट क्लास पदवी उत्तीर्ण
इलेक्ट्रनिक अॅड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रनिक टेलीकम्युनिकेशन
शासकीय मान्यप्राप्त विद्यापीठ/ महाविद्यालयात शिक्षण पुर्ण असावे
सहा महिने कंपनीत काम केल्याचा अनुभव असावा.
अनु. क्र.२ :
मेकॉनिकल/ बी. टेकमध्ये फस्ट क्लास पदवी उत्तीर्ण
शासकीय मान्यप्राप्त विद्यापीठ/ महाविद्यालयात शिक्षण पुर्ण असावे
सहा महिने कंपनीत काम केल्याचा अनुभव असावा.
अनु. क्र.३ :
इलेक्ट्रनिक/ बी. टेकमध्ये फस्ट क्लास पदवी उत्तीर्ण
इलेक्ट्रनिक अॅड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रनिक टेलीकम्युनिकेशन
शासकीय मान्यप्राप्त विद्यापीठ/ महाविद्यालयात शिक्षण पुर्ण असावे
दोन वर्षे कंपनीत काम केल्याचा अनुभव.
अनु. क्र.४ :
मेकॉनिकल/ बी. टेकमध्ये फस्ट क्लास पदवी उत्तीर्ण
शासकीय मान्यप्राप्त विद्यापीठ/ महाविद्यालयात शिक्षण पुर्ण असावे
दोन वर्षे कंपनीत काम केल्याचा अनुभव.
वयोमर्यादा:
ट्रेनी इंजिनियरसाठी २५ वर्षे
प्रोजेक्ट इंजिनियरसाठी २८ वर्षे
एससी, एसटी प्रवर्गासाठी ५ वर्षे शिथिल
ओबीसी प्रवर्गासाठी ३ वर्षे
दिव्यंगासाठी १० वर्षे वय वाढवण्यात आले.
वेतन :
प्रोजेक्ट इंजिनियर पदाचा कालावधी २ वर्षे असणार आहे. गरज भासल्यास आनखी दोन वर्षे पुढे वाढवण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी ३५ हजार, दुसऱ्यावर्षी ४० हजार, तीसऱ्यावर्षी ४५ हजार चौथ्यावर्षी ५० हजार वेतन दिले जाणार आहे. ट्रेनी इंजिनियर पदाचा कालावधी १ वर्षे राहणार आहे. समाधानकारण काम केल्यास पुढील २ वर्षे कालावधी वाढवला जाणार आहे. प्रथम वर्षी २५ हजार, द्वितीय वर्षी २८ हजार, तृतीय वर्षी ३१ हजार रुपये वेतन दिले जाणार आहे.
निवड प्रक्रीया :
एकुण १०० मार्कांचे मुल्यांकन होणार आहे. त्यात ७५ टक्के पदवीचे मार्क, १० टक्के अनुभवाला आणि १५ टक्के मुलाखतीला दिले जाणार आहे. सर्वांचे मार्क एकत्रित करुन गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानुसार उमेदवारांची निवड केली जाईल.
अर्ज कसा करावा:
उमेदवारांना https://jobapply.in/bel2020petejalahalli/ या अधिकृत संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
अधिक माहितीसाठी : https://drive.google.com/file/d/1BmFZ7MpwdnwGVVwDQruHIZ3ZEeWrKtSd/view