विना परीक्षा SBI मध्ये थेट नोकरीची संधी; जाणून घ्या! कशी होणार भरती  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 19 September 2020

सर्व परीक्षांचे गुण एकत्र करून गुणवत्ता यादी जाहीर केली जायची आणि गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड व्हायची, या सर्व प्रक्रियेला कमीत कमी सहा महिने ते एक वर्ष कालावधी लागत होता, त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ, श्रम, पैसा खर्च होत होता. तसेच विद्यार्थ्यांना मानसीक ताण सहन करावा लागायचा. या गोष्टीचा विचार करून एसबीआयने थेट भरती करण्याचा निर्णय घेतला. 

मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने विविध जागांसाठी जाहीरात प्रसिद्ध केली. या जागा थेट मुलाखतीद्वारे भरल्या जाणार आहेत, त्यामुळे उमेदवारांना लेखी परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर एसबीआयने लेखी परीक्षा स्थगीत केली. त्यामुळे एसबीआयने घेतलेल्या निर्णयाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले. पुर्वी मुख्य आणि मुलाखत दोन टप्प्यात परीक्षा व्हायची. सर्व परीक्षांचे गुण एकत्र करून गुणवत्ता यादी जाहीर केली जायची आणि गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड व्हायची, या सर्व प्रक्रियेला कमीत कमी सहा महिने ते एक वर्ष कालावधी लागत होता, त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ, श्रम, पैसा खर्च होत होता. तसेच विद्यार्थ्यांना मानसीक ताण सहन करावा लागायचा. या गोष्टीचा विचार करून एसबीआयने थेट भरती करण्याचा निर्णय घेतला. 

पदाचा तपशील, पात्रता आणि वेतन

डेप्पूटी मॅनेजर (सिक्यूरिटी) - पदे 28 

 • कोणत्याही विषयात पदवी
 • आर्मी, नेव्ही, एयर फोर्स, पॅरामिलिट्री फोर्समध्ये नोकरी केल्याचा 5 वर्षे अनुभव
 • अंसिस्टन पोलिस कमिशनर  किंवा उप विभागीय पोलिस अधिकारी दर्जापेक्षा कमी नसावा 
 • वेतन- 49 हजार 950 

मॅनेजर  - पदे 06 

 • एमबीए/ बीई/ बी. टेक मान्यप्राप्त शिक्षण संस्थेतून पास 
 • 48 महिन्याचा पर्यवेक्षणक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील अनुभन
 • वेतन- 51 हजार 490

डाटा ट्रेनी - पद 1 

 • बी. ई, बी. टेक इन सीएस/आयटी, एमसीए मान्यप्राप्त शिक्षण संस्था 
 • आयआयटी/ एनआयटी संस्थेतील टॉप विद्यार्थ्यांना प्राधान्य
 • बँकिंग क्षेत्रातली सॉफ्टवेयर इंडस्ट्रीचा 7 वर्षे अनुभव
 • वेतन - 51 हजार 490 रुपये

डाटा ट्रान्सलेटर - पद 1 

 • बी. ई, बी. टेक इन सीएस/आयटी, एमसीए मान्यप्राप्त शिक्षण संस्था 
 • आयआयटी/ एनआयटी संस्थेतील टॉप विद्यार्थ्यांना प्राधान्य
 • बँकिंग क्षेत्रातली सॉफ्टवेयर इंडस्ट्रीचा 10 वर्षे अनुभव
 • वेतन - 51 हजार 490 रुपये

सेनियर कन्सलटन्ट अॅनॉलीस्ट- पद 1

 • बी. टेक इन सीएस/आयटी, एमसीए मान्यप्राप्त शिक्षण संस्था 
 • आयआयटी/ एनआयटी संस्थेतील टॉप विद्यार्थ्यांना प्राधान्य
 • बँकिंग क्षेत्रातली सॉफ्टवेयर इंडस्ट्रीचा 12 वर्षे अनुभव
 • वेतन -  59 हजार 490

असिंस्टन जनरल मॅनेजमेंन्ट- पद 1 

 • बी. ई, बी. टेक इन सीएस/आयटी, एमसीए मान्यप्राप्त शिक्षण संस्था 
 • सीएस/ आयटी पदव्युत्तर पदवी आणि एमबीए प्राप्त विद्यार्थ्यांना प्राधान्य
 • बँकिंग क्षेत्रातली सॉफ्टवेयर इंडस्ट्रीचा 14 वर्षे अनुभव
 • वेतन - 66 हजार 70 रुपये

अर्ज कसा करावा?

उमेदवारांनी https://sbi.co.in या एसबीआयच्या अधिकृत संकेस्थळावर जावून Caceer चा पर्याय निवडावा. त्यानंतर Latest Announcement वर क्लिक कारावे. Recruitment of Specialist Cadre Officers In SBI on Regular Besis जाहीरातीवर क्लिक करावे, त्यानंतर Download Advertisement (English) आणि Apply Online असे दोन पर्याय उमेदवारासमोर येतील. त्यातील दुसरा पर्याय निवडावा आणि संपुर्ण अर्ज व्यवस्थित भरावा. शुल्क भरल्यानंतर अर्ज पुर्ण होईल.

निवड प्रक्रीया

उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर अर्जाची व्यवस्थीत छाननी केली जाईल. पात्रता, अनुभवाच्या आधारे उमेदवारांची शॉक्टलिस्ट जाहीर केली जाणार आहे.  त्यानुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहे. 100 मार्कांची मुलाखत घेऊन गुणवत्ता यादी लावली जाणार आहे. गुणवत्तेनुसार उमेदवरांची निवड केली जाणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ८ ऑक्टोबर 2020  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News