थेट मुलाखत: एनसीईआरटीमध्ये २६६ जागांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 1 July 2020

महत्त्वाच म्हणजे उमेदवारांची लेखी परीक्षा होणार नाही. केवळ मुलाखतीवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 

लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग, व्यवसाय बंद पडले. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. तरुणांवर बेरोजगारीची वेळ आली. रोजगारासाठी तरुण धडपड करत आहेत. असा वेळी नोकरीची सुवर्ण संधी शिक्षण क्षेत्रात निर्माण झाली. नॅशनल कॉन्सील ऑफ एज्यूकेशन रिसर्च ट्रेनिंग (NCERT) संस्थेत २६६ जगांसाठी भरती निघाली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण होण्याचे स्वप्न पुर्ण होणार आहे. महत्त्वाच म्हणजे उमेदवारांची लेखी परीक्षा होणार नाही. केवळ मुलाखतीवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 

अ. क्र    पदे                     जागा    

१.     प्रोफेसर                     ३८  
२.    असोसिएट प्रोफेसर      ८३ 
३.    असिस्टन प्रोफेसर        १४३
४.    लॉब्ररियन                   १ 
५.    असिस्टन लॉब्ररियन     २ 
         एकूण जागा              १६६
  

वरील सर्व पदे स्थाई स्वरुपाची आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना नेमून दिलेल्या ठिकाणी कायम स्वरुपी राहावे लागेल. नवी दिल्ली, भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूर, शिलॉंग आदी ठिकाणी नेमणूक केली जाईल. प्रत्येक पदासाठी वेगवेळी पात्रता आणि अनुभव लागणार आहे. ओपन, अनुसुचित जाती- जमाती आणि इतर मागासवर्गातील उमेदवारांना वयोमानात सुट देण्यात आली. पदाची पात्रता पाहण्यासाठी मुळ जाहीरात पाहा.  

असा करा अर्ज ?

पात्रता धारक उमेदवारांनी www.ncert.nic.in या एनसीआरटीच्या अधिकृत संकेतस्थळवर जाऊन अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ ऑगस्ट २०२० आहे. या पुर्वी उमेदवारांनी अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर ऑदर बॉकवर्ड क्लास, आर्थिक दृष्या दुर्बल आणि सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी १ हजार रुपये फी आहे. अनुसूचित जाती- जमाती, महिला, दिव्यंगासाठी मोफत अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे.      

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News