दीप्ती देवीचे लवकरच व्हिडीओ अल्बम द्वारे प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 13 March 2020

साँगफेस्ट इंडियाच्या ‘काहे कोई आँसू’ या म्युझिक व्हिडीओमध्ये ती झळकणार आहे.

अभिनेत्री दीप्ती देवीने मालिका, चित्रपट, नाटक या तीनही क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर आता ती एका हिंदी म्युझिक व्हिडीओमधून प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाली आहे. साँगफेस्ट इंडियाच्या ‘काहे कोई आँसू’ या म्युझिक व्हिडीओमध्ये ती झळकणार आहे. या गाण्यातून ती म्युझिक व्हिडीओमध्ये पदार्पण करत आहे. याबाबत दीप्ती सांगते, ‘या म्युझिक व्हिडीओसाठी मी फार उत्सुक आहे.

उत्तम संगीत आणि लग्नजिता चक्रवर्तीच्या सुमधुर आवाजातील हे गाणं प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल.’ या म्युझिक व्हिडीओमध्ये दीप्तीला पाहण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News