'या' चित्रपटासाठी दीपिकाची कसरत 

सकाळ वृतसंस्था (यिनबझ)
Thursday, 14 March 2019

ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित ‘छप्पक’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मेघना गुलजारच्या या चित्रपटात लक्ष्मीची भूमिका दीपिका पदुकोण साकारणार आहे.

या चित्रपटाच्या तयारीला ती लागली आहे. दररोज जवळपास आठ तास दीपिका या चित्रपटासाठी देत आहे. दिल्ली येथे जाऊन दीपिकाने लक्ष्मीची भेटही घेतली. मेघनाबरोबर दीपिकाही या चित्रपटाच्या कथेवर अधिक भर देत आहे. तसेच लक्ष्मीचा जीवनप्रवास सध्या ती समजून घेत आहे.

फक्त लक्ष्मीच नव्हे, तर ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या इतर महिलांचे विचार, त्यांचे राहणीमान आणि त्यांची विचारसरणीचा दीपिका अभ्यास करत आहे. ॲसिड हल्ल्यातून बचावल्यानंतर लक्ष्मीने कठीण प्रसंगांचा सामना करत स्वतःचे एक वेगळं विश्‍व निर्माण केलं. लक्ष्मीच्या याच धाडसाची कथा रुपेरी पडद्यावर दाखवण्यात येणार आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News