जॉन्टीने घेतलेला सुरेख झेल तुम्ही पाहिला का ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 14 September 2020

जॉन्टीने घेतलेला सुरेख झेल तुम्ही पाहिला का ?

जॉन्टीने घेतलेला सुरेख झेल तुम्ही पाहिला का ?

क्रिकेट जगाला वेडं केलं असं म्हणतात, ते काहीवेळा खरं वाटतं. कारण प्रत्येक खेळाडूकडे वेगळेपण असतं. मग तो खेळाडू कोणत्याही खेळातला असू द्या. खेळातलं वेगळेपण असल्यामुळे प्रत्येकाचे चाहते सुध्दा जगभरात वेगळे आहेत. अनेकदा क्रिकेटमध्ये कोणी चांगली फलंदाजी करत, कोणी गोलंदाजी,कोणी फिल्डींग, कोणाचं रनिंग चांगलं असतं अशा अनेक गोष्टी खेळाडूंकडे असल्यामुळे त्यांचे चाहते सुध्दा जगभरात तशाच पध्दतीचे असतात.

आयपीएलचा १३ वा मोसम १९ तारखेपासून सुरू होणार आहे. कोरोनामुळे यंदाचा आयपीएल मोसम भारतात खेळवता आला नाही. तसेच तो होणार की नाही याबाबत अनेकांनी साशंकता व्यक्त केली होती. परंतु येत्या १९ तारखेपासून आयपीएलचा यंदाचा मोसम दुबईत रंगणार आहे. त्याअनुशंगाने प्रत्येक संघाने सरावाला सुरूवात केली. तसेच अनेक खेळाडू सराव करत असतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाले आहेत. मागच्या दोन दिवसांपुर्वी रोहित शर्माने सराव करत असताना चेंडू मैदानाबाहेर मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चैन्नई सुपर किंग्ज यांच्यात सलामीचा सामना अधिक रंगणार आहे. यंदाचं आयपीएल दुबईत होणार प्रत्येक संघाला समान संधी असेल क्रिकेट जाणकारांचं म्हणणं आहे. अजून पर्यंत ज्या संघांना आयपीएल विजेतेपद जिंकता आलेलं नाही, त्या संघांना यंदाच्या आयपीएलमध्ये सुवर्णसंधी असेल.

दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्स हा यंदा किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहतो आहे. जॉन्टी ऱ्होड्स हा खेळाडू जेव्हापासून क्रिकेट खेळायला लागला. तेव्हापासून तो कॅच पकडणे तेही झेप घेऊन यासाठी अधिक प्रसिध्द झाला. कारण सुरूवातीच्या काही सामन्यामध्ये जॉन्टी ऱ्होड्स असे काही कॅच घेतले त्याचे चाहते तयार झाले. अजूनही तो तशीच फिल्डींग करीत असल्याचा एक व्हिडीओ आयपीएल दरम्यान व्हायरल झाला आहे.

सध्या जॉन्टी ऱ्होड्स हा किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या चतुर फिल्डींगमुळे नाव कमावले होते. पण त्याने निवृत्ती घेतल्यानंतरही तो तेवढ्याच जोशात मैदानात फिल्डींग करताना दिसतो. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सोशल मीडियावरती त्याचा एक कॅच पकडताना व्हिडीओ व्हायरल केला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News