स्मोकिंगमुळे ओठ काळे पडले? मग हे उपाय करा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 2 April 2019

अनेकदा स्मोकिंगमुळे किंवा इतर कारणांनी ओठ काळे पडतात. काळे ओठ हे तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य कमी करतात. त्यामुळे आता आम्ही तुम्हाला ओठ गुलाबी आणि सॉफ्ट ठेवण्यासाठी काही खास टिप्स तुमच्यासाठी...

अनेकदा स्मोकिंगमुळे किंवा इतर कारणांनी ओठ काळे पडतात. काळे ओठ हे तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य कमी करतात. त्यामुळे आता आम्ही तुम्हाला ओठ गुलाबी आणि सॉफ्ट ठेवण्यासाठी काही खास टिप्स तुमच्यासाठी...

  • टूथब्रश हे फक्त दात साफ करण्यासाठीच नाही तर आपले काळे पडलेले ओठही याने साफ करू शकतात. हळूहळू ओठ साफ केल्याने तुमचे ओठ गुलाबी आणि अतिशय मुलायमदार होतात.
     
  • साखर आणि लिंबू मिसळून एक स्क्रब तयार करा. हे स्क्रब दररोज आपल्या ओठांवर लावा. यामुळे तुमचे ओठ हळूहळू गुलाबी आणि सॉफ्ट होतील.
     
  • ग्लिसरीन आणि लिंबूचा रस हे फक्त तुमची त्वचाच मुलायमदार ठेवत नाही तर तुमचे ओठही काळेपणापासून दूर ठेवतं. त्यामुळे याचा तुम्ही नक्की वापर करू शकतात.
     
  • बीटचा रस किंवा त्याचा पॅक ओठांवर दररोज लावल्यामुळे हळू-हळू तुमच्या ओठांचा काळेपणा दूर होईल. 
     
  • डाळिंब हे फक्त आरोग्यासाठीच चांगलं आहे असं अजिबात नाही. तर काळे ओठ देखील गुलाबी करण्यास मदत करतं.
     
  • ओठांवरील काळेपण दूर करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या खूपच फायदेशीर असतात. गुलाबाच्या पाकळ्यांचा नियमित वापराने ओठांचा रंग हलका गुलाबी आणि चमकदार होतात. यासाठी गुलाबाच्या पाकळ्या रात्रभर दूधात भिजत ठेवाव्यात आणि सकाळी उठल्यावर त्या ओठांवर लावाव्यात. मग, सुकल्यानंतर ओठांना धुवावे.
     
  • काळ्या मि-याची पूड पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट जवळपास पाच ते दहा मिनिटे ओठांवर लावून ठेवा. त्यानंतर ओठ पाण्याने धुवा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News