सोशल मीडियावर 'हा' व्हिडीओ घालतोय धुमाकुळ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 16 May 2020

कोरोना विषाणूमुळे देश लॉकडाऊन आहे. शाळा-महाविद्यालयांपासून ते कार्यालयांपर्यंत सर्वच बंद आहे. त्यामुळे लोकांची समाजमाध्यमांवरील रेलचेल वाढली आहे.

कोरोना विषाणूमुळे देश लॉकडाऊन आहे. शाळा-महाविद्यालयांपासून ते कार्यालयांपर्यंत सर्वच बंद आहे. त्यामुळे लोकांची समाजमाध्यमांवरील रेलचेल वाढली आहे. त्यामुळे ट्‌विटरवर दररोज काहीतरी हटके ट्रेंड दिसून येतात. कधी दोन वेगळ्या विचारधारांच्या नेत्यांचे कार्यकर्ते समाजमाध्यमांवर एकमेकांना भिडतात, तर कधी वेगवेगळ्या प्रॉडक्‍टच्या आवडी-निवडीवरून नेटकरी व्यक्त होतात. हे कमी की काय, आता चक्क समाजमाध्यमांचे फॅन्सच एकमेकांमध्ये भांडत असल्याचे समोर आले आहे. टिकटॉक आणि यू-ट्युब हे दोन व्हिडीओ प्लॅटफॉर्मचे फॅन्स सध्या एकमेकांमध्ये भांडत आहेत. यू-ट्युबवर कैरी मिनाटी या नेटकऱ्याने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. त्यामध्ये टिकटॉक वापरकर्त्यांवर जोरदार टीका करण्यात आली होती. हा व्हिडीओ कोट्यवधी वापरकर्त्यांनी पाहिला. यानंतर यू-ट्युब आणि टिकटॉकच्या वापरकर्त्यांमध्ये समाजमाध्यमांवर खडाजंगी पाहायला मिळाली.

लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांत लोकांनी कुटुंबासोबत जास्त वेळ घालवला आहे. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस होता. त्यामुळे नेटकऱ्यांनी आपल्या कुटुंबाचे फोटो समाजमाध्यमांवर शेअर केले. अनेकांनी आपल्या कुटुंबीयांसोबतचे हास्यविनोदाचे व्हिडीओदेखील समाजमाध्यमांवर पोस्ट केले.प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा शुक्रवारी जन्मदिवस होता. धकधक गर्ल म्हणून माधुरीला बॉलीवूड विश्‍वात ओळखले जाते. आपल्या सौंदर्य, अभिनय आणि नृत्यामुळे त्यांनी चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य केले आहे. माधुरीच्या चाहत्यांनी समाजमाध्यमांवरून तिला जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

लॉकडाऊनमुळे मुंबई आणि महाराष्ट्रातील उद्योग बंद झाल्यामुळे परप्रांतीय मजूर आपल्या गावाकडे परत जात आहेत. समाजमाध्यमांवर या मजुरांची दयनीय अवस्था दरघडीला दिसत आहे. पायी आणि असुरक्षित प्रवास करणाऱ्या या मजुरांच्या पाठीशी उभे राहण्यात सरकार कमी पडताना दिसत आहे. शुक्रवारी एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, त्यात एक मजूर स्त्री चाकाची बॅग ओढत प्रवास करीत आहे. आणि तिचा लहान मुलगा त्या बॅगवर झोपलेला आहे. असे अनेक मजुरांचे हृदयद्रावक फोटो, व्हिडीओ समाजमाध्यमांवर पोस्ट होत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News