सोशल मीडियावर या विषयांची चर्चा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 1 July 2020

गळवारी 'समाजमाध्यम' दिवस होता. आजच्या एकविसाव्या शतकात समाजमाध्यमे संवादाचे सर्वात प्रभावी साधन म्हणून पुढे आले आहे. जगाच्या समाजिक, राजकीय आणि अर्थकारणात समाजमाध्यमे मोठी भूमिका बजावत आहेत. त्यामुळे नेटकरीच समाजमाध्यमांवर एकमेकांना या दिवसाच्या शुभेच्छा देत होते.

दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्‍वर माऊली यांच्यासह अनेक पालख्या पंढरपूरला दाखल होत असत. मोठ्या उत्साहात पांडुरंगाचा आणि विठ्ठलनामाच्या गजराने पंढरी दुमदुमून जात असे; परंतु पांडुरंगाच्या मराठमोळ्या भक्तांची यंदाची आषाढी वारी कोरोनामुळे होऊ शकली नाही. बुधवारी (1 जुलै) आषाढी एकादशी आहे. त्याचे निमित्त साधून आजपासूनच समाजमाध्यमांवर अभंगांचा आणि विठुनामाचा जयघोष सुरू झाला आहे. सर्व समाजमाध्यमे विठ्ठलमय झाली आहेत. असंख्य मराठमोळे नेटकरी पांडुरंगाचे फोटो आणि अभंगांच्या ओळी स्टेटसला अपलोड करून एकमेकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत आहेत.

भारत चीनदरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी केंद्र सरकारकडून 59 चिनी ऍप्लिकेशन्सवर बंदी घालण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईलमध्ये असलेल्या चीन ऍपपासून ते सर्व प्रकारच्या चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याबाबत नेटकरी मोहीम चालवत होते. त्यानंतर केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे नेटकऱ्यांनी जोरदार स्वागत केले; परंतु यासोबतच चिनी ऍप बंद झाल्याने त्याला पर्याय म्हणून इतर ऍप नेटकरी एकमेकांना सुचवत होते, तसेच शेअर करीत होते.

मंगळवारी 'समाजमाध्यम' दिवस होता. आजच्या एकविसाव्या शतकात समाजमाध्यमे संवादाचे सर्वात प्रभावी साधन म्हणून पुढे आले आहे. जगाच्या समाजिक, राजकीय आणि अर्थकारणात समाजमाध्यमे मोठी भूमिका बजावत आहेत. त्यामुळे नेटकरीच समाजमाध्यमांवर एकमेकांना या दिवसाच्या शुभेच्छा देत होते.

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांशी संवाद साधला. देशात कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता पंतप्रधान काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नेटकऱ्यांनीही पंतप्रधान कोरोनाच्या लसीविषयी, चीनविषयी, कोरोनाच्या नियंत्रणाविषयी आदी विषयांवर बोलतील, असे अंदाज बांधत होते. पंतप्रधानांनी "एक देश एक रेशनिंग कार्ड'ची घोषणा केली. आणि नेटकऱ्यांचे अंदाज फोल ठरले. नेहमीप्रमाणे पंतप्रधानांच्या भाषणानंतर समर्थनात आणि विरोधात नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर दिसून आल्या.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News