धोनीच्या पत्नीने घेतला नेटकऱ्यांचा समाचार; वाचा काय म्हणाली...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 June 2020

साक्षीने धोनीच्या निवृत्तीच्या बातमीचा गैरसमज करून घेण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही तिने धोनीच्या निवृत्तीबाबतच्या अफवांवर ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली होती.

मुंबई : महेंद्रसिंग धोनी क्रिकेट खेळत असेल किंवा नसेलही; पण तो नेहमीच चर्चेत राहतो. बऱ्याच दिवसांपासून धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी की नाही, यावर बऱ्याच प्रकारचे वादाचे वातावरण आहे; परंतु असे असूनही स्वत: धोनी, कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री, संघाचे व्यवस्थापक, निवडकर्ते, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी अधिकृतपणे या विषयावर काहीही सांगितले नाही. आज (# धोनीराइटर्स) असा सोशल मीडियावर ट्रेंड सुरू झाला, यावर धोनीच्या पत्नीने चांगलेच प्रतिउत्तर दिले. साक्षीने ट्विटवर लिहिले- या फक्त अफवा आहेत! मी समजू शकते की, लॉकडाऊनमध्ये लोकांची मानसिक स्थिती असंतुलित झाली आहे! # धोनीरायटर्स ट्रेंडर्स, आपले काम करा. मात्र, तिने हे ट्विट काही मिनिटांतच काढून टाकले. 

साक्षीने धोनीच्या निवृत्तीच्या बातमीचा गैरसमज करून घेण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही तिने धोनीच्या निवृत्तीबाबतच्या अफवांवर ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली होती. याआधी धोनीने विश्वकरंडकातील उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर एकही सामना खेळला नाही. यंदाच्या आयपीएल मोसमातून पुन्हा मैदानांत परतण्याची चिन्हे दिसत होती. मात्र कोरोना विषाणूमुळे आयपीएल हंगाम अनिश्‍चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. धोनीने भारताकडून 90 कसोटी सामने, 350 एकदिवसीय आणि 98 टी - 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नेतृत्वात भारताने 2007 चा टी -20 विश्वकरंडक, 2011 विश्वकरंडक आणि 2013 मधील चॅंपियन्स करंडक जिंकला आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News