खेळासाठी धोनी अनफिट-रॉजर बिन्नी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 2 August 2020
  • गेल्या दोन मोसमात महेंद्रसिंग धोनीकडून होत असलेल्या कामगिरीचा आढावा घेतला, तर त्याचा सुवर्णकाळ अस्ताला गेल्याचे स्पष्ट होते

नवी दिल्ली:  गेल्या दोन मोसमात महेंद्रसिंग धोनीकडून होत असलेल्या कामगिरीचा आढावा घेतला, तर त्याचा सुवर्णकाळ अस्ताला गेल्याचे स्पष्ट होते, असे मत माजी खेळाडू आणि निवड समितीचे माजी सदस्य रॉजर बिन्नी यांनी व्यक्त केले.

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर धोनी क्रिकेटपासून दूर राहिलेला आहे. धोनीची तंदुरुस्तीही काही प्रमाणात कमी झाली आहे. नवे तरुण खेळाडू पुढे येत आहेत. माझ्या मते धोनीने आता बॅटन पास करावा. त्याचा सुवर्णकाळही आता अस्ताला गेल्याचे जाणवत आहे, असे बिन्नी यांनी सांगितले.

एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या आयपीएलसाठी धोनीने तयारीही सुरू केली होती; परंतु कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा त्या वेळी स्थगित करण्यात आली होती. आता अमिरातीत सप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएल होणार आहे. धोनी यात खेळणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News