धोनीला वाटतं होते, की मी यॉर्कर्स बॉलिंग करू शकणार नाही - जसप्रीत बुमराह

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 11 September 2020

धोनीला वाटतं होते, की मी यॉर्कर्स बॉलिंग करू शकणार नाही - जसप्रीत बुमराह

धोनीला वाटतं होते, की मी यॉर्कर्स बॉलिंग करू शकणार नाही - जसप्रीत बुमराह

क्रिकेट हे भारतातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनावर राज्य करतं होतं आणि करत राहिलं. कारण आत्तापर्यंत क्रिकेटमध्ये अनेक बदल झाले. बदल होतं आहेत. हे सगळे बदल क्रिकेटच्या चाहत्यांना पचनी पडत असल्यामुळे क्रिकेटची क्रेझ कमी होताना दिसत नाहीए. नवीन खेळाडू प्रत्येकवर्षी संघात दाखल होतात. प्रत्येक खेळाडूकडे काहीतरी वेगळं असतं. त्या वेगळेपणाच्या जोरावर तो समोरच्या संघावरती वर्चस्व गाजवतो हे आपण सामन्यात पाहिलं असाचं एक खेळाडू भारतीय संघात सध्या खेळतोय. त्याचं नाव आहे जसप्रीत बुमराह आपल्या वेगळ्या गोलंदाजीच्या शैली आणि यॉकर्समुळे तो प्रसिध्द आहे.

जसप्रीत बुमराहने क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून  पिन-पॉईंट यॉर्कर गोलंदाजीसाठी नावलौकिक मिळविल्याचे आपण पाहतोय. ज्यावेळी त्याला भारतीय संघात स्थान मिळालं, त्यावेळी महेंद्रसिंग धोनीने सुध्दा जसप्रितवरती अधिक विश्वास नव्हता अशी आठवणही जसप्रीत बुमराहने सांगितली.

बर्‍याच लोकांना हे माहित नाही की माझी गोलंदाजी महेंद्रसिंग धोनीने कधीच पाहिली नव्हती. कारण पहिल्या सामन्यात ज्यावेळी महेंद्रसिंग धोनीने मला तू यॉर्कर्स गोलंदाजी करू शकतो? असं विचारलं होतं. कारण मी माझ्या पहिल्या सामन्यात मी डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करणार होतो ही सुध्दा आठवण सांगितली.

बुमराहने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट मैदानावर एकदिवसीय सामन्यात डेब्यू केला होता. त्या सामन्यापूर्वी धोनीने त्याला गोलंदाजी करताना पाहिले नव्हते. बुमराहने काही परिपूर्ण यॉर्कर टाकण्यात यशस्वी झाला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या ४९ व्या षटकात केवळ ३ धावा दिल्या होत्या. सुरूवातीच्या काळात ० धावांत २ बळी मिळाले.

ज्यावेळी हा सामना संपला त्यानंतर धोनी आणि जसप्रित यांच्यात चर्चा झाली, त्यावेळी तु सगळे सामने खेळले असता तर आपण मालिका जिंकली असती असा आत्मविश्वास धोनीने बोलावून दाखविला होता. त्यानंतर धोनीने मला खूप स्वातंत्र्य दिले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News