धोनीचा 'काळ' संपला : गावस्कर

जयेश सावंत (यिनबझ)
Friday, 20 September 2019

आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीचा काळ संपला आहे.  आता टीम मॅनेजमेंटला धोनीच्या नंतरचा विचार करायला हवा, असं सुनिल गावस्कर म्हणाले.

मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चा जोरावर असतानाच माजी कसोटीपटू सुनील गावस्कर यांनी याबाबत आपलं मत मांडलंय.

त्यांच्या मते, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीचा काळ संपला आहे. संघाने आता त्यांना विश्वचषक जिंकवून देणाऱ्या माजी कर्णधाराचा विचार सोडून पुढचा विचार करायला हवा. आता टीम मॅनेजमेंटला धोनीच्या नंतरचा विचार करायला हवा, असा सल्ला गावस्कर यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निवड समितीला दिला.

“आपल्याला आता  पुढील विचार करायला हवा. धोनी आता संघात बसत नाही. माझ्या संघात तरी तो बसत नाही. जर तुम्ही टी-20 विश्वचषकाबाबत बोलत आहात, तर मी रिषभ पंतचा विचार करेन. मी संजू सॅमसनबाबत विचार करेन. जर आपण टी-20 विश्वचषकबाबत विचार करत आहोत, तर मी तरुण खेळाडुंबाबत विचार करेन. कारण, आता आपल्याला पुढचा विचार करायचा आहे. धोनीबाबत माझ्या मनात आदर आहेच आणि मला वाटतं की, त्याला संघातून चांगल्या पद्धतीने निरोप दिला जावा”, असं सुनिल गावस्कर म्हणाले.

धोनीची निवृत्ती हा सध्या भारतीय क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर गावस्कर यांचं हे मत महत्त्वाचं मानलं जात आहे. न्यूझीलंड विरुद्ध पराभव होऊन भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेतून बाहेर फेकला गेल्यापासून धोनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या टी-20 मालिकेसाठीही धोनीची निवड करण्यात आलेली नाही.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कधी निवृत्ती घ्यायची आहे, हे धोनीला माहीत आहे, असं एम.एस.के. प्रसाद यांनी सागंतिलं होतं. तर प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराटनेही निवृत्ती घेण्याचा निर्णय धोनीवर सोडला आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News