धोनी आणि रोहित शर्माचे चाहते आमने-सामने; एकाला ऊसाच्या शेतात नेऊन चोपला

महेश घोलप
Sunday, 23 August 2020

धोनी आणि रोहित शर्माचे चाहते आमने-सामने; एकाला ऊसाच्या शेतात नेऊन चोपला

धोनी आणि रोहित शर्माचे चाहते आमने-सामने; एकाला ऊसाच्या शेतात नेऊन चोपला

अनेकदा खेळाडूच्या चाहत्यांचा आपण मैदानाबाहेर किंवा अन्य ठिकाणी राडा झालेला आपण पाहतो. परंतु कोल्हापूरात धोनी आणि रोहित शर्माचे चाहते आमने-सामने आले आणि एकाला ऊसाच्या शेतात नेऊन चोप दिलाची घडना घडली आहे. ही घटना कुरूंदवाड या ठिकाणची आहे. ही बातमी प्रचंड व्हायरल झाली असून सोशल मीडियावर यावर अधिक चर्चा सुरू आहे.

धोनीने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली, त्यानंतर धोनीच्या चाहत्यांनी कुरूंदवाड परिसरात धोनीच्या कौतुकाचे होर्डींग लावण्यॉत आले. त्यानंतर रोहित शर्माच्या चाहत्यांनी खेल रत्न पुरस्कार जाहीर झाल्यांनतर रोहीतचे सुध्दा होर्डींग लावण्यात आले. त्यामुळे दोन्ही खेळाडूंच्या चाहत्यांमध्ये एकप्रकारचं टशन सुरू झालं.

रोहित शर्माच्या लावलेल्या होर्डींगची कोणी अज्ञाताने फाडाफाडी केली. त्यामुळे दोन्ही गटात आणखी धुसफूस वाढली. रोहितच्या चिडलेल्या चाहत्यांने होर्डींग फाडल्याच्या रागात शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर शिवीगाळ करणा-या चाहत्याला उसाच्या मळ्यात नेऊन मारहाण करण्यात आली आहे.

दोन्ही खेळाडू भारतीय संघातून खेळतात, पण आयपीएल मालिकेत फक्त वेगळ्या संघातून खेळत असतात. त्यामुळे गावाकडं चाहत्याचे गट पडायला सुरूवात होते. याचं उदाहरण आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला मिळालं. सुरू होणा-या आयपीएल सामन्या दरम्यान असेल गट-तट पाहायला मिळतील. त्यामुळे पोलिसांनी योग्य कारवाई करणे गरजेचे आहे. झालेलं प्रकरण प्रचंड व्हायरलं झालं असून याबाबत पोलिसांकडे तक्रार आलेली नाही, अशी माहिती कुरुंदवाडचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरवडे यांनी दिली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News