धीरज देशमुखांकडून राऊतांना शांत बसण्याचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Friday, 17 January 2020
  • बाळासाहेब थोरात यांनी आयोजित केलेल्या मेधा-2020, युवा सांस्कृतिक महोत्सवात "संवाद तरुणाशी" या कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर अवधूत गुप्तेसह, धीरज देशमुख, रोहित पवार, आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, झिशान सिद्दकी आणि ऋतुराज पाटील हे नव आमदार उपस्थित होते.

संगमनेर - बाळासाहेब थोरात यांनी आयोजित केलेल्या मेधा-2020, युवा सांस्कृतिक महोत्सवात "संवाद तरुणाशी" या कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर अवधूत गुप्तेसह, धीरज देशमुख, रोहित पवार, आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, झिशान सिद्दकी आणि ऋतुराज पाटील हे नव आमदार उपस्थित होते. अवधूत गुप्ते यांनी या कार्यक्रमावेळी सर्वांना रॅपिड फायर प्रश्न केले. या प्रश्नांच्या दरम्यानच आमदार धीरज देशमुख यांनी हा सल्ला दिला आहे. धीरज यांना प्रश्न विचारला की, तुम्ही आताच्या घडीला कोणाला शांत बसायला सांगला द्याल, उदयनराजे भोसले की, संजय राऊत. यावर उत्तर देताना, राजे हे आमचे दैवत आहेत, ते राजेच आहेत; त्यामुळे आम्ही दुसऱ्यांना शांत बसायला सांगू असे, असे मत धीरज देशमूख यांनी मांडले.

या कार्यक्रमात अवधुत गुप्ते यांनी राजकीय प्रश्न न विचारता व्यक्तीश: प्रश्नांवर भर दिला. त्यात काही प्रश्न हे गमतीशर असल्यामुळे तेथे वातावरण खेळीमेळीचे होते. सर्व आमदारांनीसुध्दा त्या प्रश्नांची उत्तर दिले. या कार्यक्रमाचा आनंद या आमदारांच्या चेहऱ्यावर दिसून आला.   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News