धर्मवीर वॉरियर संघाचे घवघवीत यश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 February 2020

विक्रमगड : टेनिस क्रिकेट स्पर्धा विक्रमगड ओपन प्रीमियर लीग २०२० मध्ये धर्मवीर वॉरियर संघ विजेता ठरला; तर एस. के. फायटर संघाने उपविजेतेपद पटकाविले. १९ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा जल्लोषात पार पडली. या स्पर्धेत तालुक्‍यातील ८ संघ सहभागी झाले होते. त्यांच्यात एकूण ३७ सामने खेळवण्यात आले.

स्पर्धेच्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात अमर पष्टे यांच्या धर्मवीर वॉरियर संघाने विजय मिळवीत पारितोषिक, ७५ हजार रुपये बक्षीस, चषक पटकाविला; तर सूचित घरत व राहुल पाटील यांचा एस. के फायटर हा संघ द्वितीय विजेता ठरला. त्यांना ५१ हजार रुपये बक्षीस, चषक देऊन गौरविले; तर हार्दिक पावडे आणि प्रल्हाद भोईर यांच्या रेवा ११ स्ट्राईकर या संघाने तृतीय कृमांक पटकावला.

त्यांना ३१ हजार रुपये मालिकावीर म्हणून अमर पाटील, सर्वोत्तम गोलंदाज श्रीराज म्हसकर, सर्वोत्तम फलंदाज रूपेश सांबरे, सर्वोत्तम क्षेत्ररक्षण धनंजय वळवी यांना गौरविण्यात आले. स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी जि. प. उपाध्यक्ष नीलेश सांबरे, विक्रमगड नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष नीलेश (पिंका) पडवळे, जिल्हा परिषद सदस्य शिवा सांबरे, संदेश ढोणे, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News