धनगर समाजाने आरक्षणावर आंदोलन करू नये: प्रा. लक्ष्मण हाके

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 16 March 2020

धनगर समाजातील तरुणांनी जागृतपणे एकत्रित येऊन तुमचे हक्क डावलणाऱ्या राज्यकर्त्यांच्या विरोधात लढा उभा करावा आणि २०२१ साली होणाऱ्या जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणनेसाठी एल्गार पुकारावा असे मत प्रा. लक्ष्मण हाके यांनी मांडले.

मुंबई: १६ मार्च हा सुभेदार मल्हारराव होळकर यांचा जयंती दिवस संपूर्ण देशभर साजरा केला जातो. ज्या मल्हारराव होळकरांनी मराठी राज्य अफगाणिस्तान पर्यंत वाढवले त्यांचे वंशज आपण असून आपला खूप मोठा वारसा आहे. तेव्हा महाराष्ट्रात प्रचंड संख्येने असणाऱ्या धनगर समाजाने भिकेचा कठोरा घेऊन मागत कऱ्याची भूमिका सोडून द्यावी. तसेच ५२ परगण्याचा सुभेदार असणाऱ्या मल्हारराव होळकरांचा जाज्वल्य इतिहास असताना आरक्षण मागणे आणि राज्यकर्त्यानी ते नाकारणे म्हणजे धनगर समाजाचा अपमान आहे. 

१२ लोकसभा मतदार संघात आणि ७२ विधानसभा मतदार संघात तुमचे निर्णायक मतदान असताना तुम्हाला एकाही पक्षाचे अधिकृत तिकीट भेटत नाही. हे कशाचे लक्षण आहे, धनगर समाजातील तरुणांनी जागृतपणे एकत्रित येऊन तुमचे हक्क डावलणाऱ्या राज्यकर्त्यांच्या विरोधात लढा उभा करावा आणि २०२१ साली होणाऱ्या जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणनेसाठी एल्गार पुकारावा असे मत प्रा. लक्ष्मण हाके यांनी मांडले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News