डोंगररांगात धनश्रीला आठवले बालपण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

धनश्री म्हणते, लहानपणी आपण सगळेच एक चित्रं काढायचो. मागे अनेक डोंगर, उगवता किंवा मावळलेला सूर्य, खूप सारे ढग..त्या डोंगराच्या मधनं जाणारी एक सुंदर नदी.. आणि एखादं टुमदार घर.

कोल्हापूर - 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील धनश्री कडगावकर सध्या अरूणाचल प्रदेश, मेघालयच्या डोंगर रांगात रमली आहे. तिने नुकतेच या संदर्भात सोशल मिडियावर तिचे डिरांग खोऱ्यातील फोटो शेअर केले आहेत. या दाैऱ्यात तिला तिचे बालपण आठवले. तसेच तिने निसर्गाबद्दल आपुलकीही व्यक्त केली आहे. हे नैसर्गिक साैंदर्य जपण्याची इच्छाही तिने व्यक्त केली आहे.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Just in case.. Loving ur own fashion is just awesome.. #meghalaya

A post shared by Dhanashri Kadgaonkar (@kadgaonkar_dhanashri) on

धनश्री म्हणते, लहानपणी आपण सगळेच एक चित्रं काढायचो. मागे अनेक डोंगर, उगवता किंवा मावळलेला सूर्य, खूप सारे ढग..त्या डोंगराच्या मधनं जाणारी एक सुंदर नदी.. आणि एखादं टुमदार घर.. मधल्या काही काळात वाटून जातं, किती काल्पनिक आणि कृत्रिम चित्र आहे हे.. सगळे असच चित्रं काढतात.. बरं आणि प्रत्यक्षात हे असं आहे तरी का...

तर हो आहे असं..हे सगळं प्रत्यक्ष बघितल्यावर त्या लहानपणी काढलेल्या चित्राची खूप आठवण आली.. मला वाटतं आपल्या पैकी बऱ्याच जणांची ही आठवण ताजी झाली असेल.

तेव्हाचं हे चित्रं किती अर्थपूर्ण होतं हे आता कळतंय..हे मोठे मोठे डोंगर आपल्याला ताठ मानेने जगायला शिकवतात. नद्या प्रवाहाबरोबर जाणं शिकवतात. एका पाठोपाठ असणारी अनेक झाडं आपल्याला एकी शिकवून जातात.. लांब आणि खडकाळ रस्ते, लढण्याची वृत्ती शिकवून जातात.. सुसाट वारा थोडं घाबरवतो, त्यात पाऊस आला तर आता पुढे काय याची धाकधूक वाटते, पण मधूनच हे धुकं बाजूला सारून अरुणाचल प्रेदेशातला अरुण(सूर्य) आपलं डोकं वर काढतो आणि दिलासा मिळतो.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Dhanashri Kadgaonkar (@kadgaonkar_dhanashri) on

असा हा निसर्ग...
याला जपलं तर तो मदतीला येईल नाहीतर अणू रेणू इतकी जागा पण नसेल आपली..असा हा निसर्ग..याला जपलं तर तो मदतीला येईल नाहीतर अणू रेणू इतकी जागा पण नसेल आपली.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News