JEE, NEET परीक्षा पुढे ढकलण्याची धनंजय मुंडेंची मागणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 August 2020

JEE, NEET परीक्षा पुढे ढकलण्याची धनंजय मुंडेंची मागणी

JEE, NEET परीक्षा पुढे ढकलण्याची धनंजय मुंडेंची मागणी

महाराष्ट्र - कोरोनाच्या काळात अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्याचपध्दतीने JEE, NEET ची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून पुढे ढकलावी. तसेच २० सप्टेंबरला होणारी राज्यसेवा पुर्व परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

देशात अभियांत्रिकीसाठी एकचं JEE परीक्षा घेतली जाते. तसेच वैद्यकीय प्रवेशासाठी NEET ची परीक्षा घेण्यात येते. परंतु मार्च महिन्यात आलेल्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला, तो अजून आहे तसाच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षा पुढे ढकण्यात यावी अशी विनंती केली आहे. या परीक्षेला अनेक विद्यार्थी बसणार आहेत. सध्या महाराष्ट्रात परीक्षा घेण्यासारखी परिस्थिती नाही.

अनेक विद्यार्थ्यांची भविष्य ठरविणारी परीक्षा आहे. त्यामुळे घाई करू नका, अशा घाईमुळे विद्यार्थ्यांची मानसिकता बिघडू शकते. त्यामुळे राज्य सरकारकडून केंद्र सरकारला परीक्षा पुढे ढकलण्याबाबत मागणी करावी, असं धनंजय मुंडेनी दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News