IPLच्या पहिल्या समन्यात देवदत्त पड्डीकलची धडाकेबाज कामगीरी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 23 September 2020

रॉयल्स चँलेंजर संघाचा तरुण फलंदाज देवदत्त पड्डीकल यांनी पहिल्याच समन्यात अर्धशतक पुर्ण केले, 133 च्या स्ट्राईक रेटने ४२ बॉलमध्ये 56 रन काढले. देवदत्तने पहिल्या वेळी केलेल्या चमकदार कामगीरीमुळे चर्चेचा विषय ठरला.

मनात जिद्द आणि मेहनत करण्याची इच्छाशक्ती असेल तर यशाचे शिखर गाढणे आवघड नाही. आपल्या देशाकडून खेळण्याची एक तरी संधी मिळावी असे तरुण खेळाडूंना वाटते, खेळाडू नेहमी संधीच्या शोधात असतात. अशीच एक संधी रॉयल्स चँलेंजरचा खेळाडू देवदत्त पड्डीकल यांना मिळाली आणि या संधीचं सोनं देवदत्तने करून दाखवल. रॉयल्स चँलेंजर संघाचा तरुण फलंदाज देवदत्त पड्डीकल यांनी पहिल्याच समन्यात अर्धशतक पुर्ण केले, 133 च्या स्ट्राईक रेटने ४२ बॉलमध्ये 56 रन काढले. देवदत्तने पहिल्या वेळी केलेल्या चमकदार कामगीरीमुळे चर्चेचा विषय ठरला. देवदत्तच्या धडाकेबास फलंदाजीमुळे चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. 

2019 साली रॉयल चॅलेंजरने 20 लाख रुपयात देवदत्तला विकत घेतले. मात्र गेल्यावर्षी देवदत्तला खेळ्याची संधी मिळाली नाही. 2018 साली महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक रणजी समन्यात देवत्तने महाराष्ट्राविरुद्ध 77 धावा केल्या. 7 जुलै 2020 साली केरळ राज्यातील इदप्पाल येथे देवदत्तचा जन्म झाला. 2011 साली बंगळूर येथील कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिकेट ट्रेनिंग सेंटरमध्ये देवदत्तने क्रिकेटचे धडे गिरवले. त्यानंतर अंडर 16, 18  आणि 19 मध्ये खेळाला. 

वयाच्या सतराव्या वर्षी देवदत्तची निवड कर्नाटक प्रीमियर लिकमध्ये झाली. 28 नोव्हेंबर 2018 रोजी देवदत्तने कर्नाटक रणजी ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी दाखवली. त्यानंतर एका महिन्यांनी बंगळूर चॅलेंजर संघाने विकत घेतली. कर्नाटक ट्रॉफीमध्ये देवदत्तने 13 मॅचमध्ये 49 च्या सरासरी 609 रन बनवले. देवदत्त टॉप ऑर्डरचा बॅट्समन आहे. देवदत्तने अनेक वेळा ओपनिंग केली. लेफ्टहँड फलंदाज आणि बॉलर असा दोन्ही क्षेत्रात तो पारंगत आहे. भारताच्या अंडर 19 मध्ये देवदत्तने यापूर्वी खळले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News