मला माहित असूनही

वृषाली सानप काले
Friday, 28 June 2019

कदाचित कित्येक युगापासुन
मला माहित असूनही
मी वेळ मारुन नेत होते

कदाचित कित्येक युगापासुन
मला माहित असूनही
मी वेळ मारुन नेत होते
मनाच्या आरश्याला खोटे ठरवत होते
मला कोणीच नाही आणि कोणीच माझे नाही
असे मनाला ठणकावून सांगत होते...

मला दिसत होते
मला जाणवत होते
तुझे अस्तित्व
माझ्या प्रत्येक क्षणात
माझ्या जीवनाच्या व भावनांच्या कणाकणात
मी शोधत फिरत होते...

जे आत्मिक निखळ प्रेम.
तेच तर तू घेऊन आला होता अबोल नेत्रात..
मला जगण्याला अर्थ देण्यासाठी,
 आधार देण्यासाठी 
आणि मला जीवंत ठेवण्यासाठी...

मला माहित होते
सावल्या देणाऱ्या अनेक
साधारण वृक्षापैकी तू नव्हतास...
तूच होतास,ग्रेट,अलौकिक 
आणि सात्विक दैहिकतेच्याही पलिकडील...

म्हणूनच तर तुझी प्रत्येक कविता बोलत होती माझ्याशी.
आणि मी तिची साद ऐकतही होते
कविता कविताच असते है मान्य
पण तुझी कविता ही संवाद होता माझ्यासाठी
तुझ्या मनाने माझ्या मनाशी केलेला..

कवितेचे भाव शब्द तर स्पर्श करीतच होते
आता तुझ्या डोळ्यांचे स्वर हवेत
वाटतेय मला देखील  तुझ्या
डोळ्यातल्या डोहात
मी नकळत उतरावे एकदा..

सर्व बंधन व मर्यादा मोडीत काढत
कारण त्यांची खोली मज ठवूक आहे
नक्कीच ते तहानलेल्या वाटेवर
असणाऱ्यांच्या रिकाम्या मडक्यांना
भरणारे निव्वळ शब्दफेक नाहीत...

मला माहित आहे 
तू मला सखोल वाचलं आहेस
मला जाणलंही आहेस 
तुला मी समजली आहे... 

तर मग सांभाळ ना माझी 
ही रीती ओंजळ अन्
घे हे हात हातात
जन्म जन्मांतरासाठी...!!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News