उतार वयातील सोबती

वैशाली वर्तक
Monday, 3 June 2019

उतार वयात खरोखरच सोबती हा अत्यंत गरजेचा. एकतर निवृत्तीचा काळ त्यामुळे वेळ भरपूर. आणि वेळ भरपूर म्हणजे, इथे तिथे नको तिथे (तरुण लोकांच्या मते) लक्ष देण्यात मन सळसळत असते. आणि मग उगाचचवाद वाढविणे. त्यात उतार वयात अनुभवाचे साठवण ऊतु जात असते.

उतार वयात खरोखरच सोबती हा अत्यंत गरजेचा. एकतर निवृत्तीचा काळ त्यामुळे वेळ भरपूर. आणि वेळ भरपूर म्हणजे, इथे तिथे नको तिथे (तरुण लोकांच्या मते) लक्ष देण्यात मन सळसळत असते. आणि मग उगाचचवाद वाढविणे. त्यात उतार वयात अनुभवाचे साठवण ऊतु जात असते. अनुभवाच्या बोलांचे साठवण भरपूर असल्याने आपली मते देण्यास उगीचच मन सारखे स्फूरत असते. व आजकाल तर कोणाच  अगदी लहान मुलांना पण उपदेशाचे बोल ऐकण्यात रस नसतो वा आवडत नसते. 

"तुम्हाला काय प्रोब्लेम आहे" हा त्यांचा उलट आपणास प्रश्न असतो. तेव्हा आपणास कोणी विचारत नसता, आपण आपला " सोबती " शोधून त्यात रममाण रहाणे जास्त उचीत ठरते. तसा तर प्रत्येकाला कसला न कसला छंद असतो. नसेल तर , उतार वयात आपण आपले परिक्षण करुन तो शोधावा. जेणे करून तो आपला खरा सोबती, सांगाती बनू शकतो. तरूण वयात काही इच्छा असून वेळे अभावी वा संसाराचे गाडे ओढता राहून वा दूर्लक्षित केल्या असतात तर त्या आता लक्षात घेऊन पूर्ण करण्याचा छंद जीवास लावावा . जो सोबती म्हणून कामास येतो. सध्याच्या गतिशील युगात वैज्ञानिक युगात मोबाईल हा तर अगदी सखा सोबती आहे.

पूर्वी (हो आता पूर्वी च म्हणायची वेळ आली. ) जसे TV म्हणजे 
इडियट बाक्स म्हणायचे. पण तो रिटायर्ड मंडळीना करमणुकीचे छान साधन. अजून पण तसे आहे च नाही असे नाही. पण घरात अभ्यास करणारी नातवंडे असली की त्यांच्या अभ्यासात त्रास होतो.ती पण तिथेच येऊन बसतात .मग ऐकावे लागते. आणि आजी आजोबांना पण त्यांचा करमणूकीत व्यत्यय येतो.

पण मोबाईल हा सोबती खरच छान .त्याची पूर्ण माहिती करुन शिकून घेतले पाहिजे. त्याच्या अनेक application असतात. त्याची माहिती करुन घेतल्याने तो आपणास हवी ती भजने , भक्तीची गाणी, वा हवे ते जुने नवे टि व्ही कार्यक्रम आपल्या सवाडी प्रमाणे पहावयास हा सोबती उत्तम कामास येतो. मी माझे स्वतःचा अनुभव सांगते .आज या मोबाईल सोबती मुळे मी दिड/ पावणे दोन महिन्या पासून घरातच आहे .पायाला fracture झाले त्यामुळे डाव्या गुडघ्याचे आपरेशन झाले. अजून 20 दिवस तरी वाकरनेच चालायचे आहे .पण या मोबाईल" सोबतीने "मला जरा पण एकटे पण जाणवू दिले नाही.

घरातील बाकीची मंडळी त्यांचा त्यांच्या उद्योगास जातात .पण हाती हा सोबती असल्याने,.. मी आम्ही साहित्यिक, शब्द अंतरीचे, मनस्पर्शी, यारिया साहित्य ग्रूप, अशा अनेक समुहातील स्पर्धेत भाग घेण्यात वाचण्यात वेळ मस्त जातो व गेला. एकही दिवस कंटाळा वाटला नाही. त्यात काल पासून ह्या नव्या समुहात अमृतवेल मधे आले, आज त्याच्याच साहाय्याने लेखणीस स्फूरण मिळून या सोबतीचे गुणगान गावयास संधी मिळाली. तेव्हा उतार वयात मोबाईल सोबतीची सकाळी उठून जसे," कराग्रे वसते लक्ष्मी "श्लोक म्हणतो, तसे उठल्यावर लगेच हात "सोबतीला" शोधण्यात आतुर असतो.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News