... या कारणामुळे आयबीपीएस परीक्षेपासून लाखो विद्यार्थी वंचित

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 August 2020
  • कोरोना संकटामुळे पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा पेच अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे ऑक्‍टोबर महिन्यात होणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सोनेल सिलेक्‍शनच्या (आयबीपीएस) परीक्षेला लाखो विद्यार्थी मुकण्याची भीती व्यक्त होत आहे.

मुंबई :-  कोरोना संकटामुळे पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा पेच अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे ऑक्‍टोबर महिन्यात होणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सोनेल सिलेक्‍शनच्या (आयबीपीएस) परीक्षेला लाखो विद्यार्थी मुकण्याची भीती व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना आयबीपीएसच्या परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी युवा सेनेने आयबीपीएस अध्यक्ष राजकिरण राय यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा एप्रिल महिन्यात पार पडतात. या परीक्षांचे निकाल जून महिन्यात जाहीर होतात. यंदा कोरोनामुळे पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा झाल्या नाहीत. राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आयबीपीएसमार्फत बॅंकिंग अधिकारी आणि क्‍लार्क पदाची परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येते; परंतु यंदा कोरोनामुळे ही परीक्षा ऑक्‍टोबर महिन्यात घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे.

परवानगी देण्याची मागणी

पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निर्णय न्यायप्रविष्ट असल्यामुळे विद्यार्थ्यांकडे गुणवत्तापत्रक नाही. त्यामुळे त्यांना या परीक्षेत बसता येणार नाही. म्हणून, पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत बसू देण्याची विनंती युवा सेनेकडून आयबीपीएसचे अध्यक्ष राय यांच्याकडे केल्याचे मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News