नैराश्य आणि चिंताग्रस्त अवस्था ठरतेय सामान्य बाब

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 24 December 2019

नवी दिल्ली: प्रत्येक सात भारतीयांमागे एका व्यक्तीला मानसिक विकार जडला असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले असून, यामुळे नैराश्‍य आणि चिंता या सर्वसामान्य गोष्टी झाल्या असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. ही आकडेवारी २०१७ मधील आहे. 
मानसिक विकारांबाबतची राज्यनिहाय नोंद ‘लॅन्सेट सायकीयाट्री’ या नियतकालिकामध्ये १९९० पासून घेण्यात येत आहे.

१९९० ते २०१७ या काळात एकूण विकारांमध्ये मानसिक विकारांचे असलेले प्रमाण दुप्पट झाले असल्याचे या नियतकालिकात प्रसिद्ध होणाऱ्या अहवालांमधून स्पष्ट झाले आहे. या मानसिक विकारांमध्ये नैराश्‍य, अतिचिंता, स्किझोफ्रेनिया, दुभंगलेले व्यक्तिमत्त्व, स्वभावातील टोकाचे बदल, आत्ममग्नता यांचा समावेश आहे. २०१७ मध्ये, भारतातील १९ कोटी ७० लाख जण मानसिक विकारग्रस्त होते, त्यापैकी चार कोटी ६० लाख जणांना नैराश्‍य, तर साडेचार कोटी जणांना अतिचिंतेने ग्रासले होते. हे दोन्ही अत्यंत सर्वसामान्य विकार झाले असून, तो होण्याचे प्रमाणही वाढत आहे. 

ज्येष्ठ नागरिक विळख्यात
राज्यनिहाय विचार करता दक्षिणेकडील राज्यांमध्ये हे प्रमाण अधिक असून, त्यातही महिला या विकाराने अधिक प्रमाणात ग्रस्त आहेत. भारतातील वयोवृद्ध नागरिकांमध्ये नैराश्‍याचे प्रमाण वाढत आहे. तसेच, नैराश्‍यामुळे आत्महत्या करण्याची वृत्तीही बळावत असल्याचे अभ्यासात म्हटले आहे. त्यामुळे हे विकार होऊ नये म्हणून परिणामकारक उपाय करण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News