इतिहासातून विज्ञानाचा शोध घेणार कौशल्य प्रदर्शन 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 February 2020

इतिहासातून विज्ञानचा शोध घेणार दोन दिवसीय कौशल्य प्रदर्शन विक्रोळी येथील संदेश महाविद्यालयात आयोजित करण्यात आले

मुंबई: इतिहासातून विज्ञानचा शोध घेणार दोन दिवसीय कौशल्य प्रदर्शन विक्रोळी येथील संदेश महाविद्यालयात आयोजित करण्यात आले. सॉफ्टवेअर मुल्यांकन तंत्रज्ञान, कृषी, बेकरी, ऊस, नारळ, सार, मत्स्य, काच इत्यादी लघू उद्योगाविषयी प्रदर्शनात माहिती देण्यात आली.  

विक्रोळी येथील संदेश महाविद्यालयाच्या मातोश्री आनंदीबाई सभागृहात गुरुवार (ता.6), शुक्रावार (ता.7) दोन दिवस प्रदर्शन भरविण्यात आले होते. गेल्या दोन वर्षेापासून हे अनोखे प्रगदर्शन भरविण्यात येत आहे. प्रदर्शनाचे यंदा तिसरे वर्षे होते. प्रदर्शन पाहण्यासाठी पवई, विक्रोळी, भांडूप, डोंबिवली येथील इतिहासक व विज्ञान प्रेमींनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. 
 
विद्यार्थ्यांना इतिहास व विज्ञानाविषयी ज्ञान प्राप्त व्हावे हा प्रदर्शनाचे प्रमुख उद्देश होता. ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदेश म्हात्रे, संदेश महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. अल्का कदम यांनी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. 

साठे महाविद्यालयाच्या प्राचीन भारतीय संस्कृती विभागाचे प्रमुख डॉ. सुरज पंडीत, ठाणे येथील पर्यावरण दक्षता मंडळाच्या सचिव संगिता जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रदर्शन यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा
योजना यांनी अथक परीक्षम घेतले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News