अंध विद्यार्थी संघटनेची अंतिम सत्राची परीक्षा रद्द करण्याची यूजीसीकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 19 July 2020

राज्यातील बहुतांश विद्यार्थी संघटना परीक्षा रद्द करण्याच्या मागणीवर ठाम असतानाच आता राज्यातील अंध विद्यार्थी संघटनेनेही अंतिम सत्राची परीक्षा कोरोनाच्या परिस्थितीत देणे शक्‍य होणार नाही.

मुंबई : राज्यातील बहुतांश विद्यार्थी संघटना परीक्षा रद्द करण्याच्या मागणीवर ठाम असतानाच आता राज्यातील अंध विद्यार्थी संघटनेनेही अंतिम सत्राची परीक्षा कोरोनाच्या परिस्थितीत देणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याची मागणी पत्राद्वारे विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) केली आहे.

राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे; तर यूजीसी परीक्षा घेण्यावर ठाम असल्याने विद्यार्थी आणि पालक संभ्रमात आहेत. परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी संघटना न्यायालात गेल्या आहेत. राज्यभरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता अंध विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे ही परीक्षा रद्द करून मागील सत्रांचे मूल्यमापन करून निकाल जाहीर करावा, अशी मागणी अंध विद्यार्थी संघटनेचे राज्य संघटक गणेश साखळे यांनी पत्राद्वारे यूजीसीकडे केली आहे.

अंध विद्यार्थ्यांसमोर अनेक अडचणी
राज्याच्या कानाकोपऱ्यातून अंध विद्यार्थी शिक्षणासाठी मुंबई, पुणे यांसारख्या शहरात येतात. लॉकडाऊनमुळे शहरांमधील विद्यार्थी आपल्या गावी आलेले आहेत. त्यांना या स्थितीत शहरांमध्ये पोहचणे कठीण असल्याचे यूजीसीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.तसेच, परीक्षेसाठी लेखनिक मिळवणे, तो मिळाल्यास त्याच्या प्रवासाची व्यवस्था करणे, यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे अंध विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात अनेक अडचणी असल्याचे अंध विद्यार्थी संघटनेने केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News