आयपीएल खेळणाऱ्या संघांकडून सहा ऐवजी तीन दिवसांच्या क्वारंटाईनची मागणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 August 2020
  • २०२० मधील इंडियन प्रेमिअर लीगच्या १३व्या सीझनची सुरुवात १९ सप्टेंबर पासून होणार आहे.
  • भारतात कोरोना विषाणूचा प्राधुरभाव वाढत असल्याने ही स्पर्धा भारतात होणे शक्य नाही म्हणून यावर्षीची आयपीएल ही यूएईमध्ये होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
  • या ५३ दिवस चालणाऱ्या स्पर्धेसाठी आयपीएलमध्ये खेळणाऱ्या सर्व संघांना दुबई येथे सहा दिवसांचे क्वारंटाने पूर्ण करावे लागणार आहे.

नवी दिल्ली :-  २०२० मधील इंडियन प्रेमिअर लीगच्या १३व्या सीझनची सुरुवात १९ सप्टेंबर पासून होणार आहे. भारतात कोरोना विषाणूचा प्राधुरभाव वाढत असल्याने ही स्पर्धा भारतात होणे शक्य नाही म्हणून यावर्षीची आयपीएल ही यूएईमध्ये होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या ५३ दिवस चालणाऱ्या स्पर्धेसाठी आयपीएलमध्ये खेळणाऱ्या सर्व संघांना दुबई येथे सहा दिवसांचे क्वारंटाने पूर्ण करावे लागणार आहे. परंतु भारतात गेले सहा महिने लॉकडाऊन सदृश्य परिस्तिथी असल्याने खेळाडूंचा या दरम्यान सराव झालेला नाही. त्यामुळे सराव करण्याकरीता थोडा अधिकचा वेळ मिळावा यासाठी संघातील खेळाडूंकडून सहा दिवसांच्या क्वारंटान हे तीन दिवसांचे केले जावे अशी मागणी होत आहे. तसेच आयपीएल २०२० करीता सर्व संघाना २० ऑगस्ट नंतर यूएईत जाण्याची परवानगी आहे, परंतु चेन्नई सुपरकिंग समवेत काही संघाना २० ऑगस्ट च्या आधी दुबईत जाण्याची परवानगी हवी आहे. खेळाडूंना त्यांचा सराव करता यावा यासाठी १५ ऑगस्ट नंतर यूएईत जाण्याची परवानगी त्यांना मिळू शकते अशी माहित सूत्रांकडून मिळत आहे.

आयपीएलचा १३वा सीझन हा योग्य रीतीने पारपडावा व संघातील खेळाडूंना कोरोनाची बाधा होऊ नये याची योग्य काळजी घेतली जाणार आहे. सहा दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये तीन वेळा खेळाडूंची व इतर स्टाफची कोरोना टेस्ट केली जाईल. ह्या तीनही टेस्ट निगेटिव्ह आल्यावरच खेळाडूंना सराव करण्याची परवानगी दिली जाणार आहे. नियमांनुसार क्वारंटान असताना खेळाडूंना संघातील इतर खेळाडूंसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा करता येणार नाही. कोविड १९ ची चाचणी झाल्यावरच खेळाडूंना एकमेकांशी बोलता येईल.  तसेच ५३ दिवस चालणाऱ्या या क्रिकेट स्पर्धे दरम्यान प्रत्येक पाचव्या दिवशी खेळाडूंची व इतर सहाय्यकांची टेस्ट केली जाणार आहे. तीन दिवसांच्या क्वारंटाईन सोबतच खेळाडूंनी संघ आणि कौटुंबिक जेवणाच्या आयोजनासाठी देखील बोर्डाची परवानगी मागितली आहे. आयपीएल संघांकडून करण्यात आलेल्या मागणीवर चिकित्सा विशेष तज्ज्ञांच्या सल्यांच्या आधारेच आम्ही निर्णय घेऊ असे आयपीएल गव्हर्निंग काउन्सिल समितीने स्पष्ट केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News