प्रविण तरडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

प्रतिक कांबळे
Monday, 24 August 2020
  • काल गणेश चतुर्थी सर्वत्र घरोघरी गणपतीची स्थापना झाली.
  • त्यात मुळशी पॅटर्न चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी देखील घरघुती गणेशोत्सव साजरा करत पर्यावरण पुरक गणपतीची स्थापना केली.
  • त्या बाप्पाला पुस्तक बाप्पा असे नाव देण्यात आले होते.

मुंबई :- काल गणेश चतुर्थी सर्वत्र घरोघरी गणपतीची स्थापना झाली. त्यात मुळशी पॅटर्न चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी देखील घरघुती गणेशोत्सव साजरा करत पर्यावरण पुरक गणपतीची स्थापना केली. त्या बाप्पाला पुस्तक बाप्पा असे नाव देण्यात आले होते. सर्वत्र गणपतीच्या आजुबाजुला पुस्तकांचा देखावा साकारला होता.

परंतु त्यातील एक पुस्तक भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेले भारतीय संविधान हे ही होते आणि त्या भारतीय संविधानावर प्रविण तरडे यांनी गणपती विराजमान करत त्याचा फोटो सोशल मिडियावर शेअर करताच आंबेडकरी अनुयायी यांच्यात प्रचंड आक्रोश निर्माण झाला. त्यानंतर सोशल साईटवर प्रविण तरडे विरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी आंबेडकरी समाज आक्रमक झाला.

असेच पवईतील तरुण आंबेडकरी अनुयायी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे विक्रोळी तालुका युवा कार्याध्यक्ष राहुल गच्चे यांनी देखील आपला आक्रोश व्यक्त करीत तरडे यांच्यावर सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा या करीता पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. विजय दळवी यांच्याकडे निवेदन देत तरडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी युवा आघाडीच्या वतीने करण्यात आली.

दिग्दर्शक प्रविण तरडे प्रसिद्धीसाठी हे सर्व करत आहे. असे आमच्याशी बोलताना राहुल गच्चे यांनी सांगितले. प्रविण तरडे यांच्यावर भारतीय संविधानाचा अवमान केल्याबद्दल तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी देखील मागणी करण्यात आली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News