'या' कोर्सला जगामध्ये मागणी; करियरचा उत्तम पर्याय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 August 2020

देशासह विदेशातही डाटा सायन्स नोकरीचे विविध पर्याय उपलब्द करुन देते.

डाटा सायन्स हा करिअरचा एक लोकप्रिय पर्याय आहे, आधुनिक काळात डाटा सायन्सला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. देशासह विदेशातही डाटा सायन्स नोकरीचे विविध पर्याय उपलब्द करुन देते. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहे. सध्या विद्यार्थ्यांकडे भरपूर वेळ उपलब्ध आहे अशावेळी विद्यार्थ्यांना घरी बसून डाटा सायन्सचे ऑनलाईन कोर्स करता येतात.

काय आहे डाटा सायन्स 

डाटा सायन्समध्ये डेटाचा अभ्यास करुन विश्लेषण करण्याच काम केल जाते. विश्लेषणावर भविष्याची योजना आखली जाते. वैज्ञानिक पद्धतीने डाटावर प्रक्रिया करून त्याचा उपयोग केला जातो. अल्गोरिदमचा अभ्यास करुन सर्व माहिती एकत्र करणे आणि त्याचे विश्लेषण करण्याचे काम डाटा सायन्समध्ये केले जाते.

आर बेसिक कोर्स

हार्वर्डने इडीएक्सवर आर बेसिक कोर्स उपलब्ध करून दिला आहे. या कोर्समुळे आर सॉफ्टवेअरवर हाताळण्याचे कौशल्य शिकवले जाते. हा कोर्स डाटा एकत्र करणे आणि एकत्र केलेल्या डाटाचे विश्लेषण करण्यासाठी उपयोगात येतो. बेसिक आर सिन्यटेक्स आणि फाउंडेशन आर प्रोग्रामिंग कन्सेप्ट शिकण्यासाठी या कोर्सचा उपयोग होणार आहे. हा कोर्स केवळ दोन महिने कालावधीचा आहे. 

एक्झिक्यूटिव्ह डाटा सायन्स स्पेशलायझेशन 

जॉब हॉकिंग विद्यापीठाद्वारे एक्झिक्यूटिव्ह डाटा सायन्स स्पेशलायझेशन फोर्स विनामूल्य शिकवला जाणार आहे. हा कोर्स डाटा सायन्स मध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वांधीक लोकप्रिय आहे. डाटा सायन्स टिमचे नेतृत्व करणे आणि आपल्या टीमचा विकास करण्यासाठी उपयोगी येणार आहे. हा कोर्स दोन महिने कालावधीचा आहे. हा कोर्स डाटा सायन्समध्ये एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारा आहे.

इंटरनॅशनल बिझनेस मशीन 

मशिनची ओळख करुन देण्यासाठी सुरुवातीला इंटरनॅशनल बिझनेस मशिन या कोर्सेसला प्राधान्य दिले जाते. कोर्समध्ये पायथन अॅड एसक्यूएल सारखी नवीन कौसल्य शिकवली जातात. यामध्ये एकूण 9 कोर्सेस आहेत. हे कोर्सेस सहा महिने कालावधीचा आहे. कोर्सेरा या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News