लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 July 2020
  • साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची मागणी चांदिवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

मुंबई : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची मागणी चांदिवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे थोर समाजसुधारक, क्रांतिकारक होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र व गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळी जनजागृतीचे प्रचंड काम केले होते.

तसेच, त्यांनी बहुजन समाजाच्या न्याय-हक्कांसाठीच्या लढ्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशील होते. त्यांचे साहित्य 42 भाषांमध्ये भाषांतरित केलेले आहे. त्यामुळे देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांची कीर्ती जगभरात वृद्धिंगत करण्यासाठी त्यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे, यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करावी, अशी मागणी लांडे यांनी केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News