'या' दोन पदार्थापासून बनलेली स्वादीष्ठ लस्सी वजन कमी करण्यासाठी उपयोगी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 2 September 2020

देशातील प्रत्येक भागात लस्सी बनवण्याचे विविध प्रकार आहेत. लस्सीमध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी अनेकदा साखरेचा वापर केला जातो मात्र, साखर ऐवजी केळी आणि डाळिंबाचा वापर केल्यास शरीरात अनेक फायदे होतात.

सल्लीवर मलाई पाहताच तोंडाला पाणी सुटते, या लसीचा आस्वाद वेगळाच असतो. एकदा पिल्यानंतर नेहमी कायम आठवणीत राहणारा स्वाद होते. त्यामुळे लस्सी पारंपारिक पदार्थ संपूर्ण देशांमध्ये लोकप्रिय आहे. लस्सीपासून शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. देशातील प्रत्येक भागात लस्सी बनवण्याचे विविध प्रकार आहेत. लस्सीमध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी अनेकदा साखरेचा वापर केला जातो मात्र, साखर ऐवजी केळी आणि डाळिंबाचा वापर केल्यास शरीरात अनेक फायदे होतात. हे दोन पदार्थ शरीराला कोणते फायदे करून देतात हे आपण पाहणार आहोत.

वजन कमी करणार

लस्सी ही दुधापासून बनते. लस्सीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम, विटामिन असतात. प्रोटीन वजन कमी करण्यासाठी मदत करतात, त्यामुळे लस्सी वजन कमी करण्यास उपयोगी आहे. त्याचबरोबर कॅल्शियम हाडांची मजबुती टिकवण्यासाठी उपयोगी येते, त्यामुळे शरिरातील मासपेशी कणखर बनतात.वजन वाढवण्यात अनेक पदार्थ कारणीभुत आहेत. त्यात तेलकट पदार्थ आणि स्न्याक्स खाल्यामुळे वचन पटकन वाढते. लस्सी पिल्यानंतर कोणाही पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. 

रोगप्रतिकार शक्ती वाढते

केळी आणि डाळिंबामध्ये फायबर, विटामिन, खनिज तेल, पोटॅशियम मॅग्नेट असतात. हे शरीरामध्ये अँटिबायोटिक म्हणून रोगाशी लढतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. मात्र दोन्ही पदार्थ समप्रमाणात घेतल्यास शरीरामध्ये फायदा होतो.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News