लाडाची कूल्फी सातासमुद्रापार

संदीप काळे, रसिका जाधव (सकाळ, यिनबझ)
Thursday, 5 March 2020
  • राहुल पापळ या तरूणाचा असाही व्यवसाय, ऐकाल तर तुम्ही थक्क व्हाल..!

मुंबई -  शंभर रूपयांचा व्यवसाय जेव्हा किती तरी कोटीमध्ये खेळतो, तेव्हा तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसतो. तो पुण्यातील राहूल पापळ यांनी प्रत्येक्षात घडवून आणला आहे. त्यांनी सुरू केलेला शंभर रूपयांचा व्यवसाय आज कोट्यवधीमध्ये खेळतो आहे. हजारो हात हा व्यावसाय उभा करण्याच्या कामाला लागले आहेत. राहूलचा संपूर्ण इतिहास भूगोल या मुलाखातीच्या माध्यमातून आम्ही मांडला आहे. तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर राहुल या पुण्याच्या अवलियाला एकदा नक्की भेटाच..! राहुलचा व्यवसाय पुणे आणि मुंबईपर्यंत मर्यादित राहिला नाही तर तो सातासमुद्रापलीकडे गेला आहे. वाचा सविस्तर मुलाखतीमध्ये.  

तुमच्याबद्दल काय सांगाल?

माझं नाव राहूल शिवाजी पापळ आहे. मी राहायला पुण्यातील बिवेवाडी येथे आहे. माझा व्यवसाय आहे, आताचा लाडाच्या कूल्फीचा  

आठवी नापास असून लाखो रुपयांचा व्यवसाय करताय, याची प्रेरणा कुठून मिळाली?

प्रेरणा ही छत्रपतींची आहेच. 2009 सालापासून मी इतिहासाच्या कामात होतो आणि वर्गणी मागून शिवजयंती करणे हा पॅटर्न झाला आहे आणि तोच पॅटर्न मी राबवत होतो. शिवजंयती करणे, त्यावेळेस मांडे सर असतील प्रविण दादा असतील तर दादाचा कंन्स्ट्रक्शन व्यवसाय मोठा. प्रविण दादा गायकवाड त्याच्या ऑफिस गेलो दादांना म्हणालो की, दादा वर्गणी हवी आहे शिवजयंतीची.. तर दादा म्हणाले की, तू वर्गणी घेण्यापेक्षा कधीतरी देणारा हो, एवढी उंची गाठ.  आज छत्रपती असते, तर काय केल असतं? आता काय कोणाशी लढाईच नाही आहे. आज तु घरचे आई-वडिल जरी व्यवस्थित संभाळले तरी ते शिवाजी महाराजासाठी ते मोठ कार्य आहे. तू आधी आर्थिक सक्षम हो, दादांना माझी आर्थिक परिस्थिती माहिती होती, परिस्थिती बिकट होती. खाली आल्यावर माझा मित्र करण बांदल आम्ही दोघांनी चर्चा केली तेव्हा आम्ही ते लाईटली घेतल की, दादा असा का म्हणाले? त्यांच्याकडे प्रचंड पैसे आहेत. दादांनी का अस नाकारलं? तेव्हा दादा अर्थिक अडचणीबद्दल बोलत होते. तेव्हा आम्ही ते लाईटली घेतल आणि खरचं जेव्हा अडचण आली तेव्हा ते बोलले ते शब्द आम्हाला आठवले. तेव्हा खरंच वाटलं की, ही आर्थिक परिस्थिती तोड तोड तोडली पाहिजे आणि मग आपण काय केल पाहिजे? आणि त्यावेळेस तेव्हा मी आईसक्रीम लाईनमध्ये होतो. एका कंपनीत होतो, मी पण त्या कंपनीत असताना मी साधारण सेल्समन होतो. मी त्या आठवड्यात जो जास्त सेल्स आणेल त्याला बक्षीस असायच. ते बेचाळीस आठवडे लागोपाट मला भेटत होतं. त्याचवेळेस आमचा जो मॅनेजर मार्केटिंग हेड होता तो काम सोडून गेला. काम सोडून गेल्यानंतर जे आमचे कंपनीचे ओनर होते. ते म्हणाले राहूलला मार्केटिंग हेड करा. कारण तो बेचाळीस आठवडे टॉपर आहे. त्यांच्या शिक्षणाकडे जाऊ नका त्यांची मार्केंटिंग स्किल चांगली आहे. आठ कोटी कंपनीचा टन ओवर होता तो साधारण मी तेरा कोटीवर नेला. त्यावेळेस मनात आले की, आपण यापेक्षा चांगले प्रोडक्ट काढून स्वत:ची कंपनी उभी करू शकतो. ही कल्पना जेव्हा माझ्या डोक्यात आली, तेव्हा मी काम सोडल आणि बायकोला सहा महिने सांगितलच नाही मी दररोज डबा घेऊन जायचो पण फॅक्टरीची जागा किंवा काय पाहिजे माझ्या काही मित्रांनी मला थो़डी आर्थिक मदत देखील केली. कशी कंपनी केली पाहिजे? फक्त पाच वर्ष मी कुल्फीची आरेडी केली. माझ्या किंवा तुमच्या लहानपणी थंड एखादी गोष्ट खायची असेल तर बर्फाचा गोळा किंवा कूल्फी होती. डोक्यावर तो माणूस लेंगा शर्ट घालून यायचा आणि सगळ्यांना कूल्फी द्यायचा. म्हटलं की, कूल्फीला एक स्टेज दिल पाहिजे. जुन प्रोडक्ट आहे आणि आपली ओळख आहे, ती ओळख लोकासमोर मांडली पाहिजे. मग कूल्फीला नाव काय द्यायचं? मित्रांना विचारलं, बरेच जणांनी नंबर वन अशी इंग्रजी नाव दिली नाहीत. पण मला मराठी नाव पाहिजे होत. असंच माझ्या डोक्यात आल नुकतीच मला मुलगी झाली होती, "लाडाची कुल्फी" असं नाव मी फायनल केलं आणि ती लाडाची कूल्फी जेव्हा मी बरेच लोकांना सांगितलं. लाडाची कूल्फी हे नाव ठेवण्याच कारण कूल्फी आणि आईस्क्रीम आपण आनंदाने खात असतो आणि लाडाने खात असतो, कारण ती सांडू नये म्हणून काळजी घेत असतो, अशी कल्पना माझ्या डोक्यात आली. त्या नावाने मी रजिस्टर करून ते प्रोडक्टचा ब्रँड जेव्हा बाजारात उतरवाला तेव्हा आम्ही आश्चर्यचकित झालो होतो. कारण आमची पहिली जी शाखा होती ती गरवारे कॉलेजाला सेंटर मॉलला आणि त्या शाखेला पैसे कोण लावणार हा मोठा प्रश्न होता. कारण काय आहे की, तुमची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर लोक तुमच्याकडे शंकेने बघतात. लोक पैसे लावतील का? त्यातून मी गेलो आहे कारण त्यावेळेस माझ्याकडे सुध्दा पैसे नव्हते. ती कशी तरी कंपनी उभी केली होती पाच वर्षात अशा काही गोष्टी आल्या होत्या घरातील काही सोन विकून सुध्दा लाईट बिल भरलेलं आहे, पण मी स्टेबल राहिलो. त्यावेळेस मी शिवाजी महाराज यांचं थोडं डोक्यात घेतल की, मिर्जा राजे जयसिंग जेव्हा आला होता जेव्हा स्वराज्य गेले होते. तेव्हा महाराज किती शांत असतील प्रत्येक वेळेस मी त्यांनी त्या परिस्थितीत त्यांनी काय केल असेल? हे डोक्यात घेऊन मी पुढे गेलो.

वडील गेल्यानंतर घर कस चालंयच?

वडिलांना कँसर होता. त्याच्यामुळे घरची जबाबदारी फार लवकर पडली होती आंगावरती.  सर्वात पहिले वडिल असताना पानपट्टी होती आमची. बिबेवाडी कमानिच्या दोनच्या बाहेर होती. दोन वर्ष मी पानपट्टीवर थांबलो होतो. 2001 साली न्यू गूर्जर फॉर्मटिकल्समध्ये सदाशिव पेढेत मी कामाला लागलो होतो. आई फूलांचे हार ओवायची ते तिने 50 पैशापासून विकायला सुरूवात केली होती. 16 हार ओवल्यानंतर 50 पैसे भेटायचे. तेव्हा आईला त्या सुई टोचून हाताची बोट काळी पडत होती. आईला सहा महिन्याला किंवा वर्षाला धनुर्वाताचे इंजेक्शन घ्याव लागत होत.

आज तुमच्या आईला कसं वाटते? तूमची मुलगी दोन वर्षीची आहे तिला कसं वाटते?

आईला जो आनंद आहे तो प्रत्येक आईला आसावा असं मला पहिल्यांदा वाटतं. आईला आमच्या देवदर्शन करायला खूप आवडत, त्यामुळे प्रत्येक वर्षाला आईला मी फिरायला दोन लाख रूपये देतो. जी आई 50 पैशाने हार ओवत होती तिला आज दोन लाख रूपये नुसते फिरायला देतो. तिला जे वाटत ते करावं, काय वाटत तिथे खायचं, तिने जिवंतपणी पंचपक्वान खावं, तिने तिच्या मनासारखं राहावं.

मस्तानीपासून ते पेरू कुल्फीपर्यंतचा प्रवास काय सांगाल?

प्रथम जी कुल्फी काढली ती आम्ही 28 प्रकारची काढली आहे. त्यात एक काढली ती शुगर फ्री..  कारण संपूर्ण कुटुंबात 5 व्यक्ती जरी असतील तर, वृध्द व्यक्ती येतात. पण त्यांना मधुमेह (डायबेटीस) असल्यामुळे त्यांना खाता येता नाही. त्यामुळे आम्ही त्यांचा विचार केला आहे आणि त्यांनी कूल्फी खाल्ली  पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी शूगरफ्री कूल्फी बेसिक काढली. त्यांच्यात आमचा लाडका फेल्वर आमच्या आतापर्यंत आलेला म्हणजे रेड पेरूचा फेल्वर त्या कूल्फीवर आम्हाला तिखिट मीठ टाकून खावी लागते. त्यानंतर आम्ही शतावरीची आईस्क्रीम काढण्याचं ठरवलं. हे आईस्क्रीम  महिलांना मल्टीव्हिटॅमिनच  काम करत असत आणि लहान मुलांना पण चालते ती, पण लहान मुले शतवारी पित नाहीत. माझ्या डोक्यात आल की, आईस्क्रीममधून शतावारी व्हिटॅमिन लहान मुलांच्या पोटात जाव आणि मार्चमध्ये आम्ही अशवगांधारी लॉन्च करतो आहे. आईस्क्रीमच्या कूल्फीची कॉलेटी एवढी सुंदर आहे की, त्यात कुठेही बर्फ लागणार नाही. आम्ही इसेन्सचा वापर करत नाही आम्ही फळाचा पल जो आहे, त्यांच्यावर खूप काम केलं आहे. दुधाचा जी कॉलेटी, जे रॉ मटेरियल उत्तम प्रकारचे वापरले आहे, त्यामुळे उत्तम प्रोडक्ट येत. जेव्हा आमची कंपनी केली तेव्हा आईच एक वाक्य होत की,  बाळा कोणाला फसवू नको, तू जो प्रोडक्ट काढणार तो लोकांच्या पोटात जाणार आहे, त्यामुळे अतिशय प्रामाणिकपणे व्यवसाय कर एक दिवस तूझ्याकडे लाईन असेल आणि ते खरंच झालं आहे.

आईच हाताला पडलेले काळे डाग आणि तुमच्याकडे असलेला पैसे यांच वेगळेपण तुम्ही कसं जपलंय?

वेगळेपण जपलं आहे की, आता दोनच महिने झाले आईला सांगितल आहे की, हे काम करू नको.  मला ते हात बघून वाईट वाटायचे. आई म्हणाली की, मी अशी घरात बसणार नाही, मला काहीतरी काम दे.  कारण तिने तिच्या आईकडे असताना धुणीभांडी केली होती. लहानपणापासून कष्ट केलेली आई आहे ती, आई म्हणाली की, मी जर थांबली तर मी आजारी पडेल म्हणून मी तिला एक स्वतंत्र एक आउटलेट काढून दिल आहे, माझा भाऊ आणि आई दोघे मिळून ते आऊटलेट चालवतात. असा छोटासा उद्योग सुरू करून दिला आहे.

तुम्ही आठवी नापास, वाहिनी सीए, आणि दोन वर्षांची मुलगी २० हजार कमावते, हे सगळं गणित काय आहे?

आठवी नापास मुलाला बॅंकिग करणारी बायको मिळाली हे माझं नशिबच आहे. माझ्या कंपनीचा जो हिशोब आहे तो ती सगळाच बघत असते. कारण बॅंकिगच तिच नॉलेज असल्यामुळे ते पाहते.  सीए भविष्यात ती होईल. माझी जी मुलगी आहे ती मला माझ्या डोक्यात आलं की, कूल्फीला एक मॉडेल पाहिजे आहे जशी निरमाला मुलगी आहे पारलेजीला जशी मुलगी आहे तशी माझ्या कुल्फीला पण एक मॉडेल पाहिजे होती. ती मॉडेल कशी असली पाहिजे, हा विचार करत असानाच माझ्या डोळ्यासमोर माझी मुलगी आली. मी तीच चित्र काढल आणि आज ती माझ्या कंपनीची ब्रँड अँबेसिडर आहे. तिला महिन्याला 20हजार रूपये मिळतात. त्यांच पगारवर तिच शिक्षण आणि तिचा खर्च होतो. मुलांनी त्यांच्याच कमाईवर त्याच आयुष्य घालवल पाहिजे.

अभियांत्रिकी मुलं तुमच्याकडे आहेत, ते काय काम करतात? आणि हा व्यवसाय मला सुरू करायचा असेल तर कसा करावा?

7 एप्रिल 2018 ला ही आमची पहिली शाखा होती. आमचे तीन मित्र आहेत उमेश, सिद्धार्थ आणि विवेक यांनी फार मदत केली. ते शाखा घ्यायला तयार झाले होते. त्यांना सांगितल होत की, लॉस झाल तर माझा असेल आणि फायदा झाला तर तो संपूर्ण तुमचा असेल या शर्यतीवर आमची पहिली शाखा सुरू झाली होती. पहिली शाखा सुरू केली आणि पहिल्या शाखेच महिन्याचे उत्पन्न 49 हजार 200 रूपये होत, आणि त्या शाखेवर आम्ही खर्च केला होता फक्त दोन लाख रूपये. टेम्पो घेणे, डिझाईन घेणे असा तो प्रकार होता. त्यानंतर सरकार नगरची शाखा, त्यानंतर कॅपातली शाखा अशा शाखा वाढत गेल्या. आता मी चिंचवडला शाखा सुरू केली. ते सॉफ्टवेअर इंजिनयर आहेत ते त्यांनी नोकरी सोडून कूल्फीचा व्यवसाय सुरू केला. त्यांना आधी पगार 15 हजार, 18 हजार किंवा 25 हजार आणि आता त्यांना सगळ्यांना 40 हजार दर महिन्याला पगार आहे. ते पण घर बसल्या आहे काम संध्याकाळी  6 ते 12 काम असते. काही इंजिनियर हे ते काम करून मग माझी शाखा सांभाळतात. पण त्याचा पगार 20 हजार येत होता आणि माझी शाखा त्यांना 40 हजार पगार देत होती. मग साईट बिझेनस कोणता इंजिनियर की कूल्फी? यांच्यात लोक गोंधळू लागली.  हा व्यवसाय आपण कंटिन्यू केला पाहिजे. आता बरेच जण शाखा घ्यायला  येतात त्यांना आपण शाखांना रेडिज दिली आहेत.  प्रत्येक शाखेला तीन किलोमीटरच अंतर आहे. शाखा घेण्यासाठी तुम्ही लोकेशन ठरवले पाहिजे की, तुम्ही कुठे लावणार? तो परिसर कसा आहे?  रहिवासी परिसर अशा परिसरात आपली कूल्फी जास्त जाते. तो झोन क्रिऐट करून मग तुम्ही आमच्या ऑफिसला आले पाहिजे. ऑफिसला आल्यानंतर तुम्हाला बाकीची माहीती दिली जाते. ती किती रूपायला येते किती रूपायला जाते,  मग तुम्ही व्यवसाय कसा केला पाहिजे? ग्राहकांशी कसे बोलले पाहिजे? ग्राहक हा देव आहे, या पध्दतीने मी मानतो याला प्रमाणपेक्षा जपतो. लोकांना टिकवून ठेवण फार महत्त्वाच आहे. मी शाखेंना जपेल तुम्ही लोकांना जपल पाहिजे.

हा उद्योग नव्याने सुरू करणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल?

यात तीन-चार गोष्टी आहेत, एक तर प्रामाणिकपणा असणे गरजेचा आहे. प्रामाणिकपणा नसेल तर तुमचा व्यवसाय चालेल पण जास्त काळ चालणार नाही. दुसर म्हणजे तुम्ही मॅन्युफॉक्चरीन मध्ये जात असाल तर उत्तम कॉलेटी पाहिजे. नुसत बर असून चालत नाही, नुसत चांगल असून चालत नाही, उत्तमातून उत्तम व्हाव लागते,  हा सल्ला मला माझ्या गायकावड सरांनी दिला होता. म्हणून जे प्रोडक्शन काढलं, ते उत्तमच पाहिजे. त्यांच्यात तुमचं उत्तम रेट पण पाहिजे. व्यवसाय करताना आपण दिलेला चेक बाऊन्स नाही झाला पाहिजे. फेक कमेन्ट ज्या आहेत त्या आपण कोणत्याही व्यवसायात दिल्या नाही पाहिजेत. या तीन-चार गोष्टी तुम्ही पाळल्या तर नक्कीच तुमच्याकडे एक दिवस लाईन असल्याशिवाय राहणार नाही. आज ती लाईन आमच्याकडे आली आहे.

तुमच्या पत्नीने तुम्हाला यात कशी साथ दिली? त्या कशा तुमच्या पाठी उभ्या राहिल्या?

बायको ही जवळची मैत्रिणच असते आणि तिला मैत्रिण म्हणून तुम्ही तिला वागवलं पाहिजे. तिच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर केली पाहिजे. तीच शिक्षण माझ्यापेक्षा जास्त असल्यामुळे ती प्रत्येक गोष्ट सांगायची की, आपण पुढे काय केल पाहिजे. प्रत्येक गोष्टीत तिला तर स्वच्छता अधिक लागते. तिचा तो थोडासा गुण माझ्यात आलेला आहे. कंपनीपासून ते घरापर्यंत स्वच्छतेचा तो गुण माझ्यात आला आहे. मग ती डिझाईनमध्ये सांगायची की, हे थोड वेगळं पाहिजे म्हणजे या काही कल्पना आहेत, ती मला देत होती आणि त्या कल्पना इम्प्लिमेंट करून आज खूप मोठा ब्रँड झाला आहे. 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News