DelhiCAA : CBSE बोर्डाच्या 86 केंद्रावरील 10 वी, 12 वीचा परीक्षा रद्द

यिनबझ टीम
Wednesday, 26 February 2020

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) उत्तर पूर्व दिल्लीतील 86 परीक्षा केंद्रांवर २6 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. सीबीएसईने आपल्या ट्विटर हॅंडलवरून ही माहिती दिली आहे.

26 फेब्रुवारी रोजी दहावीचा 'इंग्लिश कम्युनिकेटिव्ह', 'इंग्रजी भाषा आणि साहित्य' हा पेपर आहे. त्याच वेळी, 12 वी बोर्डाचा ‘वेब एप्लीकेशन’ आणि ‘मीडिया’ हा पेपर होता. दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचारामुळे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. पूर्व दिल्लीतील सात आणि उत्तर पूर्व दिल्लीतील 79 केंद्रांवर (एकूण 86) केंद्रावर हा पेपर रद्द करण्यात आला आहे.

दिल्ली आणि इतर देशांत या परीक्षा पूर्व निर्धारित वेळापत्रकानुसार असतील. सीबीएसईने म्हटले आहे की उत्तर पूर्व दिल्लीतील पेपर न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News