दिल्ली विद्यापीठाची प्रवेश पुर्व परीक्षा रद्द; आता गुणवत्तेवर प्रवेश मिळणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 29 June 2020

पुर्वी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी मुलाखत द्यावी लागत होती. ही अट विद्यापीठाने यंदा रद्द केली. आत्ता गुणवत्तेच्या आधारावर युजीला थेट प्रवेश मिळणार आहे.

दिल्ली : कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिल्ली विद्यापीठाने नियमात काही महत्त्वपुर्ण बदल केले. पुर्वी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी मुलाखत द्यावी लागत होती. ही अट विद्यापीठाने यंदा रद्द केली. आत्ता गुणवत्तेच्या आधारावर युजीला थेट प्रवेश मिळणार आहे. विद्यापीठानी घेतलेल्या निर्णयाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले. मात्र हा नियम दिल्ली विद्यापीठातून युजी केलेल्या विद्यार्थ्यांना लागू होणार आहे. इतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पीजीसाठी प्रवेश पुर्व परीक्षा द्यावी लागणार आहे.
 
सध्या युजीसाठी नाव नोंदणी सुरु आहे. ४ जुलै पर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. आतापर्यंत ७१ हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यंदा १५ टक्क्यांनी पीजीच्या जागा वाढल्या आहेत. त्यामुळे १२ हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पीजीसाठी प्रवेश मिळणार आहे.

पीजी प्रवेशाचा फार्म्युला

50 टक्के प्रवेश गुणवत्तेवर आणि 50 टक्के प्रवेश पुर्व परीक्षेत मिळालेल्या मार्कांवर दिले जाणार आहेत. त्यामुळे दिल्ली विद्यापीठातून युजी करणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 टक्के आरक्षण मिळणार आहे. आणि इतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी 50 कोटा शिल्लक राहणार आहे. दोन्ही याद्या एकाच दिवसी प्रसिद्ध केल्या जातील असे विद्यापीठ प्रशासनाकडू सांगण्यात आले.

प्रवेश पुर्व परीक्षा कधी होणार?

युजी प्रवेशाची नोंदणी सुरु असली तरी प्रवेश परीक्षा केव्हा होईल हे निश्चित नाही. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची एकाच वेळी परीक्षा घेणे शक्य नाही. कोरोनाच्या परिस्थितीचा फेरआढावा घेऊन प्रवेश परीक्षासंबंधी निर्णय नॅशनल टेस्ट एजन्सी (एनटीए) घेईल असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News