दिल्ली विद्यापीठाच्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; १८ जुलैपर्यंत नोंदणी करता येणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 5 July 2020

कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिल्ली विद्यापीठाने नियमात काही महत्त्वपुर्ण बदल केले.

दिल्ली : कोरोनाचा विषाणूच्या पार्श्वभुमीवर दिल्ली विद्यापीठाने प्रवेश नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ दिली. नोंदणीची अंतिम तारीख ४ जुलै होती. त्याला मुदतवाढ देऊन १८ जुलै करण्यात आली. ही मुदतवाढ १४ दिवस वाढवण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदणी करण्यासाठी वेळ मिळणार आहे. विद्यापीठाच्या निर्णयावर विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.  

शुक्रवारपर्यंत (ता.०३) २ लाख ९४ हजार २२८ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली. त्यापैकी १ लाख ७० हजार ९७१ विद्यार्थ्यांनी फी भरली. पीजीसाठी १ लाख ११ हजार २१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी फक्त ७१ हजार ७८२ विद्यार्थ्यांनी फी भरली.  एम. फिल, पी. एचडी प्रवेशकरिता १८ हजार ६०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली त्यापैकी सर्वांनी फी भरली.

दरवर्षी पदवी पुर्वी, पदव्युत्तर, एम. फिल, पी. एचडी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यानंतर प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. प्रवेश प्रक्रियेची नोंदणी सुरु असली तरी प्रवेश परीक्षा केव्हा होईल हे निश्चित नाही. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची एकाच वेळी परीक्षा घेणे शक्य नाही. कोरोनाच्या परिस्थितीचा फेरआढावा घेऊन प्रवेश परीक्षासंबंधी निर्णय नॅशनल टेस्ट एजन्सी (एनटीए) घेईल असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. 

कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिल्ली विद्यापीठाने नियमात काही महत्त्वपुर्ण बदल केले. पुर्वी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी मुलाखत द्यावी लागत होती. ही अट विद्यापीठाने यंदा रद्द केली. आत्ता गुणवत्तेच्या आधारावर युजीला थेट प्रवेश मिळणार आहे. मात्र हा नियम फक्त दिल्ली विद्यापीठातून युजी केलेल्या विद्यार्थ्यांना लागू होणार आहे. इतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पीजीसाठी प्रवेश पुर्व परीक्षा द्यावी लागणार आहे. 50 टक्के प्रवेश गुणवत्तेवर आणि 50 टक्के प्रवेश पुर्व परीक्षेत मिळालेल्या मार्कांवर दिले जाणार आहेत. त्यामुळे दिल्ली विद्यापीठातून युजी करणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 टक्के आरक्षण मिळणार आहे. आणि इतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी 50 कोटा शिल्लक राहणार आहे. दोन्ही याद्या एकाच दिवसी प्रसिद्ध केल्या जातील असे विद्यापीठ प्रशासनाकडू सांगण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News