दिल्लीतील चर्चेचे लोण गल्लीपर्यंत

जयकुमार अडकीने पाटील
Sunday, 9 June 2019
  •  लोकसभा निवडणुकीत भाजपाचे जोरदार यश, भाजपा विरोधी राजकीय पक्षाना एव्हीएम व निवडणूक आयोगावर संशय
  • लोकभावनेचा आदर करून मतपत्रिकेव्दारे मतदान घेणे गरजेचे?भाजपकडून निवडणूक आयोगाची पाठराखण
  • लोकसभा निवडणुका निकालावर व्यक्त होत आहे  प्रश्नचिन्ह
  • लोकशाहीचा गळा घोटल्याचा होत आहे आरोप

नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष स्वबळ ३०३ व मित्र पक्ष ५० असे एनडीए गटाने एकूण ३५३ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसला देशभरात केवळ ५२ जागा मिळून संवैधानिक विरोधीपक्षनेते पद प्राप्त करण्यासाठीही काही सदस्य संख्या कमीच पडत असल्याने व अनेक मतदारसंघात योग्य उमेदवार देऊन चांगल्याप्रकारे प्रचार यंत्रणा राबवून व प्रत्यक्ष चांगला प्रतिसाद दिसत असतांनाही लाखांच्या फरकाने पराभूत होण्याची पाळी अनेक उमेदवारावर आल्याने ही बाब भाजप विरोधी  राजकीय पक्षाना चांगलीच जिव्हारी लागली. देशभरात सर्वच भाजपा विरोधी पक्षांनी आपल्या यंत्रणेमार्फत फेरआढावा घेऊन वस्तुस्थितीचा अभ्यास करून झालेल्या लोकसभा निवडणुकीत इव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असल्याचे निष्कर्षांप्रत आल्याचे दिसत आहे.

याबाबीमुळे कधी नव्हे ती  निवडणूक आयोगाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. देशभरात निवडणूक झालेल्या ५४२ पैकी ३७३ मतदारसंघात इव्हीएम मशीन मधील नोंद झालेले मतदान व प्रत्यक्ष मतमोजणी करतांना निघालेले मतदान यामध्ये अनेक ठिकाणी मोठी तफावत असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून होत आहे. याबाबत लवकरच देशव्यापी जनआंदोलन उभारणार असल्याची शक्यता निर्माण झाली असून विरोधीपक्षांतर्फे जनआंदोलनाची तयारी सुरु झाली असल्याचे दिसून येते.

 ईव्हीएम मशीन वर संशय असणाऱ्या मतदारांची संख्या मोठी असून भाजपा विरोधी मतदान करणारे नागरिक आता उघडपणे बोलून दाखवत असून मागील सरकारच्या चुकीच्या काही धोरणाने व्यक्तिगत नुकसान सोसावे लागलेल्या अनेक मतदारांनी अंतकरणातून  झालेल्या जनतेच्या त्रासाचा बदला घेण्यासाठी भाजप-सेना युतीच्या विरुद्ध उमेदवारास मतदान केले असल्याची गावागावात, चावडी, पारावर चर्चा रंगत असून दिल्लीतील चर्चेचे लोण आता गल्लीपर्यंत पसरलेले दिसत आहे.

याउलट एकीकडे  भाजप समर्थक मंडळी मात्र निवडणुक हरली की इव्हीएम घोळ झाला म्हणत असतात असे म्हणून   भाजप विरोधकाची खिल्ली उडवताना दिसत असले तरी खरोखरच जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा संधी  दिली असल्याचे मानणाऱ्या मंडळीचे मात्र इव्हीएमला जोरदार समर्थन असल्याचे दिसत आहे. यामुळे जर पंतप्रधान मोदिजीचे सर्व निर्णय जनतेने डोक्यावर घेतले असल्याची पक्की  खात्री त्यांच्या समर्थकांना असेल तर ईव्हीएमने मतदान झाले काय किंवा मतपत्रिकेव्दारे जनतेचा कौल ज्यांना आहे त्यांनाच मिळणार असल्याने विजयाची धास्ती बाळगण्याचे काहीही कारण नसतांना ही मंडळी  ईव्हीएमचेच खंदे समर्थक का बनत आहेत हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहत आहे.

याबाबत मात्र मोठ्या प्रमाणात संशयकलोळ निर्माण झाला आहे. देशभरात सत्तास्थानी पोहचलेल्या भाजपाला मिळालेल्या मतदानाची टक्केवारी पाहू जाता ३८ % असून ६२ % मते विरोधात गेलेली आणि हीच विरोधात गेलेली ६२ % हे लोकशाही मध्ये बहुमत होत असल्याने ६२ % च्या भावनेला कोलदांडा देऊन ३८ % मते घेऊन संख्याबळ राखत जिंकून येणाऱ्याची  बाजू घेतल्या जात असल्याचे लोकशाहीचा गळा घोटला जातो राजकीय तज्ञातून बोलल्या जात आहे. मात्र स्वबळावर सत्ता स्थापन करण्याइतक्या जागा मिळवून तगड्या बनलेल्या भाजपाशी पंगा कुणी व कशासाठी घ्यायचा या भावनेने नरो वा कुंजरोवा भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. 

लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्शभूमीवर निवडणूक आयोगावर संशयाची सुई फिरत असतांना निवडणूक आयोगाने पुढील सर्व निवडणुका मतपत्रिकेव्दारे घेण्याचे जाहीर करून  देशभरातील बहुसंख्य जनभावनेचा आदर करून आरोप खोडून काढणे शहानपणाचे ठरेल अन्यथा कोणत्या भागाचे कोण आमदार कोण खासदार हे थेट नियुक्त्याच देऊन निवडणूक यंत्रणेसाठी लागणारा कोट्यावधीचा खर्च तरी वाचवून देशहीत साधावे असे उपरोधिकपणे बोलल्या जात आहे. निवडणूक आयोग इतिहासात पहिली वेळ त्यांच्यावर लागलेला एकतर्फी बाजू घेतल्याचा आरोप कसा खोडून काढते हे पाहण्याचे  मात्र औत्सुक्य जनतेला आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News