दिल्ली विधानसभा निवडणूक: काय आहेत तरुणींच्या अपेक्षा जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 February 2020
  • राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरणान्यातून तरुणींना सुरक्षा देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे दिल्लीच्या तरुणींनी नाराजी व्यक्त केली आहे

8 जानेवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. पक्षांच्या प्रचार सभेने दिल्लीचे वातावरण तापले आहे. मतदारांना अनेक अश्वासने देवुन त्यांचे मन वळवण्य़ाचा प्रयत्न सर्व राजकीय पक्ष करत आहेत. मात्र, राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरणान्यातून तरुणींना सुरक्षा देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे दिल्लीच्या तरुणींनी नाराजी व्यक्त केली आहे. तरुणींना फक्त महिला म्हणून न पाहता पक्षांनी सामान्य मतदार म्हणून पाहावे. अशा अपेक्षा तरुणींनी व्यक्त केल्या आहेत. पक्षांकडून तरुणीच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.  

वयस्कर महिला म्हणतात की 'अनेक राजकीय पक्षांना वाटते, महिलांवर होणारे अन्याय दूर केले पाहीजे आणि महिलांना सुरक्षा पुरवली पाहीजे त्यामुळे निवडणूक जाहीरणान्यात सुरक्षा आणि अत्याचार हे दोनचं विषयी अग्रस्थानी असतात. तर तरुणी म्हणतात 'सुरक्षेसह नोकरी, व्यवसायाची संधी, विशेष शिक्षण अशा तरतूती पक्षांनी जाहीरनाम्यात करायला हव्यात, त्यामुळे तरुणींना सामाजिक न्याय मिळेल.

निवडणूक काळात राजकीय पक्ष 'महिलांची सुरक्षा' यावर बोलत असतात, आम्ही फक्त सुरक्षा देणार म्हणून मतदान करायचे असेल तर ते चुकीच आहे. आम्हाला वीज, पाणी, नोकरीची आवश्यकता आहे त्यामुळे सामान्य मतदाराप्रमाणे पक्षांनी आमच्या सोबत व्यवहार करावा.
-सरीत विहार,
तरुणी, आयटी इंजिनिअर  

तरुणींना स्वतंत्र विचार करण्यासाठी पक्षांनी वळ दिले पाहीजे, नविन क्षेत्रात करिअरची संधी उपलब्ध करुन दिली पाहीजे, मात्र सर्वात राजकीय पत्र महिलांना सुरक्षेच लॅलीपॉप देत आहेत.
- रेखा गौतम,
विद्यार्थी, एआरएसडी महाविद्यालय, नवी दिल्ली.

सुरक्षा तर सर्वांना पाहिजे मात्र इतर सेवाचं का? बस मध्ये महिलांना विनामुल्य प्रवास आहे. मतदारांना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा महिलांना मिळाव्यात.
रानी देवी,
महीला, मायापूरी 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News