तुझ्या ओठांची परिभाषा

चैतन्य
Friday, 26 April 2019

सुंदरतेच्या पलीकडल जगावेगळं 
एक गाव...
यालाच तर मज मी रेखितो 
सलोनी हे नाव 

बावरलेल्या पाखरांना सांगू कसे तुझे मुखवटे 
तू दिसते अन पंख उमलती पाखरे !

लकलक असे तुझे नयन कसे,
अंधाऱ्या रातीत चमकती चांदणी ठसे ।।

सुंदरतेच्या पलीकडल जगावेगळं 
एक गाव...
यालाच तर मज मी रेखितो 
सलोनी हे नाव 

मोहरलेल्या या फुलांनी बहरले तुझे रूप 
तुझ्या नयना मधल्या सुंदरतेला  
फुलपाखरांचे स्वरूप... 

बोलक्या तुजं ओठांनी,
जुळली नात्यात बंधता। 
मज मी शोधितो,
तुझ्या ओठांची परिभाषेतील नम्रता...   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News