एकजुटीने नियम पाळू कोरोनाला हारवू: स्वराज्य संघटना

शुभम कस्तूरे
Tuesday, 14 April 2020

मानवाला ज्या तंत्रज्ञानाचा अतिगर्व होता ते सर्व तंत्रज्ञान यासमोर नतमस्तक झाले. मात्र, ज्याला सुरुवात आहे त्याला शेवट हा आहे हे नियतीचे सूत्र आहे, त्यामुळे हा आजार थांबवण अवघड आहे मात्र, अशक्य मुळीच नाही.

जगासमोर निर्माण झालेलं हे कोरोना आजाराचं संकट दूर करण्यासाठी आपल्या सर्वांच्या एकजुटीची आवश्यकता आहे. या आजाराने सर्व जगाला बंद करण्यासाठी भाग पाडले. मानवाने नैसर्गिक गोष्टींचा सर्वनाश करण्याचा प्रयत्न केला तर निसर्ग आपले रौद्ररूप धारण करू शकतो असा संदेशच जणू या आजारामार्फत सर्व माणवास दिला गेला.

मानवाला ज्या तंत्रज्ञानाचा अतिगर्व होता ते सर्व तंत्रज्ञान यासमोर नतमस्तक झाले. मात्र, ज्याला सुरुवात आहे त्याला शेवट हा आहे हे नियतीचे सूत्र आहे, त्यामुळे हा आजार थांबवण अवघड आहे मात्र, अशक्य मुळीच नाही आणि यासाठी मोठं मोठे शास्त्रज्ञ दिवस रात्र एक करून यावर लस शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसून येत आहेत.

या आजारावर विजय मिळवण्यासाठी जसे पंतप्रधान, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, डॉक्टर, पोलीस प्रशासन, सरकारी अधिकारी, कर्मचारी हे अत्यंत मेहनत घेत आहेत त्याचवेळी आपले देखील एक कर्तव्य आहे की या सर्व जबाबदार व्यक्तींकडून दिल्या जाणाऱ्या सूचना या आपल्या भल्यासाठी व जनतेच्या हितासाठी आहेत याचा विचार करून आपण सर्वांनी कृती केली पाहिजे. आपल्याला प्रशासनाकडून ज्या सूचना मिळाल्या आहेत त्या सूचनांचे पालन करणे व नियम काटेकोरपणे सांभाळणे हे देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. दिवसातून सारखं हात स्वच्छ साबणाने धुणे, सॅनिटायझर वापरणे, मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टनसिंग पाळणे, घराबाहेर न पडणे, योग्य जनजागृती करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. त्याचबरोबर संपूर्ण जग व देश आर्थिक संकटात सापडलेले असताना अशा परिस्थिती मध्ये ज्यांचे हातावर पोट आहे अशा सर्व बांधवांस मदत करणे हे देखील आपले आद्यकर्तव्य आहे.

तरी स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून जनतेच्या रक्षणासाठी अतोनात कष्ट घेणाऱ्या सर्व नायकांस आमचा मानाचा मुजरा व घरात बसून प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या सर्व जनता जनार्दनास देखील सलाम व्यक्त करून अशीच काळजी यापुढे ही घेण्याचे आवाहन स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ऋषिकेश आहेर व सर्व पदाधिकारी यांचे मार्फत करण्यात आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News