'या' अ‍ॅपवरुन केली प्रेयसीची बदनामी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 15 September 2020
  • सध्या अनेक मुले-मुलींना ब्लॅकमेल करत असतात.
  • पण या प्रकरणात प्रियकारनेच प्रेयसीचे आक्षेपार्ह व्हिडिओच्या आधारे समाज माध्यमावर बदनामी करण्याचे एक प्रकरण नालासोपाऱ्यामध्ये उघडकीस आले आहे.

वसई :- सध्या अनेक मुले-मुलींना ब्लॅकमेल करत असतात. पण या प्रकरणात प्रियकारनेच प्रेयसीचे आक्षेपार्ह व्हिडिओच्या आधारे समाज माध्यमावर बदनामी करण्याचे एक प्रकरण नालासोपाऱ्यामध्ये उघडकीस आले आहे. आरोपी तरुणाने टिकटॉक या अ‍ॅपवर महिलेच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्या तसेच या महिलेचे बनावट फेसबुक खाते तयार करून त्यावरही आपत्तीजनक फोटो प्रसारित केले होते.

नालासोपारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ३० वर्षांची असून ती नालासोपारा पश्चिम येथे राहते. तिचे याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. दरम्यान, आरोपीने तिची समाजमाध्यमांवर बदनामी करण्यास सुरुवात केली. त्याने महिलेच्या व्यक्तिक फोटोची व्हिडिओ तयार करून ती ‘टिकटॉक’ अ‍ॅपवर प्रसारित केली. तसेच या महिलेचे फेक फेसबुक खाते सुरू करून त्यावरही दोघांचे आक्षेपार्ह फोटोची पोस्ट केली. हे सर्व फोटो आणि व्हिडिओ त्याने पीडित महिलेच्या कुटुंबीयांना पाठवून तिची बदनामी केली. व्हॉट्सअ‍ॅपवरही आरोपीने बदनामी केली.

याबाबत पीडितेने नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असला तरी आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. आम्ही या प्रकरणाचा तपास करत असून गुन्हाची कारणे तपास असल्याची माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गोसावी यांनी दिली. आम्ही तपास करत असून त्याने हे कृत्य का केले तसेच कशा प्रकारे बदनामी केली त्याचा शोध घेत आहोत.

गोसावी, सहायक पोलीस निरीक्षक नालासोपारा पोलीस ठाणे

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News