दीपिकाची लक्ष्मीसाठी तारेवरची कसरत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ टीम )
Saturday, 13 April 2019

अभिनेत्री दीपिका पदुकोणचा चित्रपट येणार म्हणजे सिनेरसिकांसाठी फिल्मी मेजवानीच असते

अभिनेत्री दीपिका पदुकोणचा चित्रपट येणार म्हणजे सिनेरसिकांसाठी फिल्मी मेजवानीच असते. अर्थातच दीपिकाची यामागे प्रचंड मेहनत आहे. तिचा अभिनय बोलका असला तरी प्रत्येक भूमिका रुपेरी पडद्यावर जिवंत करण्यासाठी ती दिवस-रात्र झटते.

आताही तिने ‘छपाक’ चित्रपटासाठी कंबर कसली आहे. ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालची ही कथा आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील तिचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
या लूकसाठी आणि मेकअपसाठी दिवसभरातील जवळपास तीन ते चार तास ती मेकअप रूममध्ये घालवते. तासन्‌ तास एकाच जागी बसणं म्हणजे दीपिकासाठी तारेवरची कसरतच आहे. शिवाय चित्रीकरण संपल्यावर मूळ पदावर येण्यासाठीही तिला तितकाच वेळ लागत आहे. पहिल्यांदाच बॉलीवूडच्या मस्तानीचा नॉन-ग्लॅमरस लूक रुपेरी पडद्यावर दिसणार आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News