दीपिकाला आवडते पुरणपोळी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 2 January 2020

शोमधील स्पर्धक रोहित राऊतने दीपिकासाठी पुरणपोळी आणली होती. खरं तर पुरणपोळी दीपिकाचा फेवरेट पदार्थ आहे. दीपिका म्हणते, ‘मी या शोमध्येही पुरणपोळी खात खात गाण्यांचा आनंद घेतला.

सध्या दीपिका पुदकोण ‘छपाक’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ती बऱ्याचदा भावूक होतानाही दिसली. दीपिकाने सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजन वाहिनीवर सुरू असलेल्या ‘इंडियन आयडॉल सीझन ११’ या रिॲलिटी शोमध्ये हजेरी लावली होती.

या शोमध्ये फार धमाल-मस्तीही केली. या शोमधील स्पर्धक रोहित राऊतने दीपिकासाठी पुरणपोळी आणली होती. खरं तर पुरणपोळी दीपिकाचा फेवरेट पदार्थ आहे.

दीपिका म्हणते, ‘मी या शोमध्येही पुरणपोळी खात खात गाण्यांचा आनंद घेतला.’ यावेळी दीपिकाच्या चित्रपटांमधील गाणीही या शोमधील स्पर्धकांनी सादर केली. गाण्यांबरोबरच पुरणपोळीचा गोडवा दीपिकाने एन्जॉय केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News